नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
आज, 25 जून 2025 रोजी, नासाच्या केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा येथून ॲक्सिऑम मिशन 4 चं प्रक्षेपण करण्यात आलंय. या मोहिमेत भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेचे (घ्एठध्) अंतराळवीर, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला, स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळयानाचे पायलट म्हणून सहभागी झाले आहेत. ही मोहीम भारताच्या अंतराळ क्षेत्रातील प्रगतीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण शुक्ला 1984 मध्ये राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहे. या मोहिमेत पोलंड आणि हंगेरीच्या अंतराळवीरांचाही समावेश आहे.
कोण कोण आहेत सहभागी?
ॲक्सिऑम मिशन 4 नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधील लॉंच कॉम्प्लेक्स 39अ येथून फाल्कन 9 रॉकेट आणि नवीन ड्रॅगन अंतराळयानाद्वारे प्रक्षेपित झालं. या मोहिमेचे नेतृत्व माजी नासा अंतराळवीर आणि ॲक्सिऑम स्पेसच्या मानव अंतराळ उड्डाण संचालक पेगी व्हिटसन करताय. यात पोलंडचे स्लावोझ उझनान्स्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कपु हे मिशन विशेषज्ञ म्हणून सहभागी आहेत.
ॲक्सिऑम मिशन 4 मोहिमेचं उद्दिष्ट
ॲक्सिऑम 4 चा चमू आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (घ्एए) सुमारे दोन आठवडे राहणार आहे. यावेळी ते विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (एऊएश्) यांच्याशी संबंधित पाच संयुक्त वैज्ञानिक संशोधन आणि दोन शैक्षणिक प्रात्यक्षिके करतील. तसंच, खासगी अंतराळ संचालनाला प्रोत्साहन देण्यासाठी व्यावसायिक आणि जनजागृती उपक्रमही राबवले जातील. नासा आणि रशियाच्या अंतराळ संस्थेनं (रोस्कॉसमॉस) सुरक्षा तपासणीनंतर या मोहिमेला अंतिम मंजुरी दिली आहे.
आंतरराष्ट्रीय सहकार्य
2020 मध्ये माजी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील करारानंतर ही मोहीम नियोजित करण्यात आली. भारत, पोलंड आणि हंगेरीच्या अंतराळवीरांचा समावेश असलेली ही पहिली व्यावसायिक मोहीम आहे. नासा आणि ॲषक्सऑम स्पेस यांच्यामुळं पुढं मंगळ मोहिमांवर लक्ष केंद्रित करता येणार आहे.
ॲक्सिऑम मिशन 4 महत्त्व ही मोहीम भारताच्या अंतराळ क्षेत्रातील वाढत्या क्षमतेला अधोरेखित करते. ग्रुप कॅप्टन शुक्ला,राकेश शर्मा यांच्या पावलांवर पाऊल ठेवत भारताच्या अंतराळ इतिहासात नवा अध्याय लिहित आहेत.
