रूकडी / महान कार्य वृत्तसेवा
रुकडी येथील संभाजीराव माने गर्ल्स हायकुल व ज्युनि. कॉलेजचे लॅब असिस्टेंट व प्रियदर्शनी सहकारी पतसंस्थेचे संचालक धनाजी बाजीराव माने यांनी आपल्या वडील कै.बाजीराव गोविंदराव माने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कार्य दिनी (तेरावा) या दिवशी सामाजिक संस्था आधार फाउंडेशनचे संस्थापक संदीप बनकर यांच्याकडे वृक्षारोपणासाठी पंधरा देशी झाडे सुपूर्द केली.
यावेळी माजी सरपंच किरण भोसले, भगवान जाधव, माजी प्राचार्य सदाशिव भोसले,आधार फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संदीप बनकर धनाजी माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
वृक्ष लागवड व संवर्धन वृक्षदान या उपक्रमात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी म्हणून धनाजी माने यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी जपण्यासाठी त्यांच्या स्मृतिप्रत्यार्थ वृक्षदान केले हे खरंच कौतुकास्पद आहे.
संदीप बनकर,संस्थापक अध्यक्ष, आधार फाउंडेशन
