तारदाळ / महान कार्य वृत्तसेवा
तारदाळ, खोतवाडी परिसरात जलजीवन योजनेचे गेले दोन वर्षे अत्यंत संथ गतीने सुरू असून संपूर्ण गावातील निम्म्याहून अधिक रस्ते जल जीवन योजनेच्या खुदाईमुळे उखरलेले आहेत. त्यामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
उकरलेल्या रस्त्यावर खुदाईचे काम पूर्ण झाल्यानंतर रोलिंग करणे गरजेचे होते तसे न केल्याने सदरच्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्या खड्ड्यात पाणी साचून अनेक छोटे-मोठे अपघात दररोज होत आहेत. तसेच सतत होणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर प्रचंड दलदल निर्माण झाले आहे. याचा नाहक त्रास वाहनधारकांना व शालेय विद्यार्थ्यांना तेथून जाताना होत आहे. तरी तारदाळ ग्रामपंचायतीने संबंधित मक्तेदाराकडून गावातील उखरलेले सर्व रस्ते दुरुस्त करून घ्यावेत. अशा आशयाचे निवेदन माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराने यांनी ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजीरे, सरपंच सौ.पल्लवी पवार यांना दिले आहे.
यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते.
