इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
किमान वेतन द्यावे, यासाह विविध मागण्यांसाठी घंटागाडीवरील १२ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशव्दारात आजपासून उपोषण सुरु केले आहे.
इचलकरंजी शहरात घंटागाडीच्या माध्यमातून घरोघरी जावून कचरा संकलीत केला जातो. एन डी के या मक्तेदार कंपनीच्या माध्यमातून हे काम केले जाते. या कंपनीने विमा योजनेचे पैसे वेतनातून कपात करण्यात आले आहे. पण त्यांना विमा योजनेचे कार्ड दिलेले नाही. पीएफ फंडाबाबत दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे किमान वेतन व विमा योजनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करीत आज सकाळपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
सचिन साठे, विजय कांबळे, अंकुश कुरणे, महादेव कांबळे, अभी जावळे, अजय नेतले, शक्ती गागडे, विठ्ठल कांबळे, महेश हेगडे, अमोल वासुदेव, सद्दाम देसाई, संजय निकम असे बारा कर्मचारी उपोषणाला बसले आहेत. उपोषण न करण्याबाबत महापालिका प्रशासनाने विनंती केली होती. पण त्यांची विनंती धुडकावून आंदोलनाला सुरुवात केली आहे.
याबाबत तोडगा काढण्यासाठी महापालिका उपायुक्त अशोक कुंभार यांचे दालनामध्ये आंदोलनावर तोडगा काढण्याचे काम सुरू होते. परंतु, आंदोलनावरकोणताही तोडगा न निघता सायंकाळी सात वाजता आंदोलनकर्त्यांनी आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका घेतली, असून मंगळवारी दुपारी मक्तेदार आल्यानंतर पुन्हा बैठक घेऊन तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात येणार, असल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष प्राचार्य पाटील यांनी यावेळी सांगितले.
