Spread the love

रूकडी / महान कार्य वृत्तसेवा

आधार फाउंडेशनच्या वतीने अल्लम प्रभू येथे एक हजार देशी झाडांचे वृक्षारोपण लोकसहभागातून करण्यात आले. यामधील इचलकरंजी, सांगली, अतिग्रे रूकडी परिसरातून उपस्थित असणाऱ्या लोकसहभागातून हे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती

या फाउंडेशनच्या माध्यमातून प्रतिवर्षी रामलिंग, धुळोबा, आलमप्रभू या तीर्थक्षेत्र परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन केले जात आहे. या फाउंडेशनने देशी वृक्षाचे महत्व लक्षात घेऊन सातत्याने वृक्षारोपण करून ते वृक्ष  मोठे होईपर्यंत त्यांचे संवर्धन केले जाते.

रुकडी रेल्वे स्टेशनच्या परिसरात उभारलेला ऑक्सिजन पार्क व रुकडी परिसरातील केलेली यशस्वी वृक्षाचे संवर्धन याची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन या फाउंडेशनला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या उपक्रमाबरोबरच या फाउंडेशनने रुकडी परिसरातील रुग्णांना रुग्णवाहिका सेवा अल्प दरात उपलब्ध करून दिली आहे.

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असल्याने आधार फाउंडेशन २००७ पासून सातत्याने वृक्षरोपण व त्याचे संवर्धन करण्याचे कार्य करत आहे. आज अल्लम प्रभू येथे एक हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी इचलकरंजी,सांगली, अतिग्रे रूकडी परिसरातून उपस्थित असणाऱ्या वृक्षप्रेमींचे मी आभार मानतो. तसेच यावेळी मिलिंद ढवळे यांनी अन्नदान केले त्यांचे आभार मानतो. तसेच या वृक्षारोपणासाठी ज्याने वृक्षदान केले त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो.

 संदीप बनकर, अध्यक्षआधार फाउंडेशन संस्थापक