Spread the love

वॉशिंग्टन / महान कार्य वृत्तसेवा

अमेरिकेनं शनिवारी रात्री इराणच्या तीन अणुस्थळ फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान यांच्यावर हल्ले केले. इराणवरच्या हल्ल्‌‍याला अमेरिकेनं ऑपरेशन मिड नाईट हॅमर असं नाव दिलं. या हल्ल्‌‍यांमुळे इराणच्या अणुस्थळांचं मोठं नुकसान झाल्याचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. ट्रम्प यांनी द सोशल ट्रुथ या सोशल मीडिया साईटवर काही फोटो पोस्ट करुन या नुकसानीची माहिती दिली. तसेच, इराणमध्ये ‘सत्ता परिवर्तन’ होण्याची शक्यताही वर्तवली.

या हल्ल्‌‍याला संपूर्ण विनाश म्हणणंच योग्य राहील : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी द सोशल ट्रुथवर फोटो पोस्ट करुन सांगितलं की, ”सॅटेलाईट फोटोंनुसार इराणच्या सर्व अणुस्थळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याला ‘संपूर्ण विनाश’ म्हणणंच योग्य ठरेल.” तसेच, ”ही जी पांढरी रचना दिसते आहे, ती खडकांच्या आत खोलवर बनलेली आहे, तिचं छतदेखील जमिनीखाली आहे आणि ती पूर्णपणे आगीपासून सुरक्षीत आहे. पण खरं आणि सर्वात मोठं नुकसान जमिनीखाली झालं आहे. अगदी अचुक निशाणा.”

… तर इराणमध्ये सत्ता परिवर्तन करणार : यानंतर आणखी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणमध्ये सत्ता परिवर्तन होईल, असं सांगितलं आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प यांनी लिहिलं की, ”’शासन बदल’ (ुीाग्स म्प्रहुा) हा शब्द वापरणं राजकीयदृष्ट्‌‍या योग्य नाही, पण जर सध्याची इराणी राजवट इराणला पुन्हा महान बनवण्यास असमर्थ असेल, तर राजवट बदल का करू नये??? श्घ्उअ!!! (मेक इराण ग्रेट अगेन)”

ट्रम्प यांच्याकडून सैन्याचं कौतुक : पुढं ट्रम्प यांनी आणखी एक पोस्ट करत अमेरिकन सैन्याचं कौतुक केलं. ”इराणमधील अणुस्थळांचं नुकसान मोठं होतं. हे हल्ले कठीण आणि अचूक होते. आपल्या सैन्यानं उत्तम कौशल्य दाखवलं”. दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, ”महान बी-2 वैमानिक नुकतेच मिसुरीमध्ये सुरक्षितपणे उतरले. उत्तम काम केल्याबद्दल धन्यवाद !!!”

इस्रायल-ईराण युद्धात अमेरिकेची एन्ट्री : तत्पूर्वी, अमेरिकेनं इराणच्या फोर्डो अणुस्थळावर 30,000 पाउंड वजनाचा बंकर-बस्टर बॉम्ब टाकला. यानंतर दुसऱ्या दिवशी तेहराननं कोणतीही किंमत मोजून स्वरक्षण करण्याची शपथ घेतली.

अमेरिकेनं हल्ला का केला? संरक्षण सचिवांनी सांगितलं : दरम्यान, अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी रविवारी अमेरिकेनं इराणमध्ये सुरू केलेल्या ऑपरेशनच्या यशस्वीतेची माहिती दिली. ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ एअर फोर्सचे चेअरमन जनरल डॅन केन यांच्यासोबत झालेल्या एका मीडिया ब्रीफिंगमध्ये हेगसेथ म्हणाले की, ”अमेरिकेनं फोर्डो, इस्फहान आणि नतान्झ येथील अणुठिकाणांवर अचूक आणि यशस्वी हल्ले केले”. विशेष म्हणजे, हेगसेथ यांनी पुढं बोलताना हेदेखील स्पष्ट केलं की, ”अमेरिकेच्या या कारवाईचा उद्देश इराणी सैन्य किंवा सामान्य नागरिकांना लक्ष्य करणं नव्हता. तसेच, ही कारवाई इराणमधील सत्ता बदलासाठीदेखील नव्हती किंवा आहे. ही कारवाई केवळ इराणच्या अणु महत्वाकांक्षांना झटका देण्यासाठी होती”.