Spread the love

शाहूवाडी / महान कार्य वृत्तसेवा 

शाहूवाडी तालुक्यात पावसाचा जोर असलेने कासारी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे अणुस्कुरा जवळ असणारा प्रसिद्ध बर्की धबधब्याकडे   जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे.

आज सकाळी पर्यटक , नागरिक परगावाहून तेथे आले असता पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. 200 फुटांपेक्षा अधिक उंचीवर असलेला , जंगल परिसर , थंड हवा , कोल्हापूर पासून जवळ आणि जंगल भ्रमंती सोबत गावरान जेवण मिळत असलेने दरवर्षी लांबून लांबून पर्यटक येत असतात. यात तरुणांची संख्या लक्षणीय असते. पुणे ते गोवा जाणारे हौशी प्रवासी अणुस्कुरा येथून पुढे गोवा कडे जाताना आवर्जून या धबधब्याला भेट देतात. गेल्या आठ दिवसापासून या भागात चांगला पाऊस झाला आहे.