इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी येथील पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेची वार्षिंक सर्वसाधरण सभा समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी शिवगोंडा खोत होते.
यावेळी बोलताना खोत म्हणाले, पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटना ही विक्रेत्याच्या एकजुटीवर उभी असून आज संघटना प्रत्येक निर्णय हा विक्रेत्याच्या भविष्याचा विचार करुन घेत आहे. यामधूनच आपण येणार्या अडचणीवर मात करित पुढे जात आहोत. यापुढे देखील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या आयुष्यात कायम स्वरूपी स्थिरता यावी. यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेले वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ लवकर कार्यान्वीत व्हावे. यासाठी आपण पुढाकार घेणार असून लवकरच या संदर्भात पश्चिम महाराष्ट्रामधील सर्व तालुका पदाधिकारी यांची बैठक घेणार आहे, असे सांगितले.
यावेळी सचिव अण्णा गुंडे यांनी संघटनेच्या विक्रेत्यांच्या विविध सुचनाचे निरसन करून भविष्यात संघटनेची आर्थीक स्थिती कशी मजबूत केली जाईल यांची माहिती दिली.
यावेळी संघटनेला सहकार्य केल्याबद्दल बलराम भोजणे, मिलिंद वेदपाठक, मनोज खेतमर व अतुल मुंसडी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेचे खजिनदार नारायण शिंदे यांनी नोटिस व विषयांचे वाचन केले व सर्व विषय एकमताने मंजूर करुन घेतले. श्रध्दांजलीचे वाचन सुरेश चौगुले यांनी केले. तर अभिनंदनाचा ठराव कृष्णा हजारे यांनी मांडला. सुत्रसंचलन शिवानंद रावळ यांनी केले. तर स्वागत महेश बावळे यांनी केले. शेवटी आभार अमर मुंसडी यांनी मानले. सभेला मोठ्या प्रमाणात वृत्तपत्र विक्रेते बंधू उपस्थीत होते.