कुरुंदवाड / महान कार्य वृत्तसेवा
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेची घंटा वाजली. हजारो चिमुकल्या बालकांंनी, विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी शाळेची पायरी चढली. पहिल्या दिवशी येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूलमध्ये माजी नगरसेवकांच्या हस्ते नवागतांचे पुस्तके व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांंतून आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
शाळेच्या पहिल्या दिवशी नवे शालेय साहित्य, नवा गणवेश, नवे सवंगडी, नवे शिक्षक अशा प्रसन्न उत्साही वातावरणात आज शाळेचा पहिला दिवस होता. नवीन वर्गात विद्यार्थ्यांना नेऊन सोडण्यासाठी पालकांची लगबग सुरू होती. पहिल्या दिवशी नवीन वर्गात प्रवेश करताना नवीन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल व उत्साह जाणवत होता. वर्गात प्रवेश करून पहिल्या बेंचवर बसण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू होती. सकाळी साडेदहा वाजता प्रार्थना घेण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक दीपक गायकवाड, फारुख जमादार व सामाजिक कार्यकर्ते अजित देसाई यांच्या हस्ते शासनाकडून आलेल्या पाचवी ते आठवीच्या पुस्तकांंचे संच व गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे पालकांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
सकाळी 11 वाजता पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू झाले. विद्यार्थ्यांनी शाळेच्या पायऱ्यांचे दर्शन घेऊन आज प्रवेश केला. जुने सवंगडी भेटल्यानंतर एकमेकांना शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा करून नवीन वर्ष सुरू झाल्याने शाळेत आनंदाचे वातावरण होते.
प्रारंभी मुख्याध्यापिका विनया जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी पालकांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना माजी नगरसेवक दीपक गायकवाड फारूक जमादार व नॅशनल इन्स्टिट्यूट एज्युकेशन सोसायटीचे सचिव अजित देसाई यांच्या हस्ते पुस्तक संच वाटण्यात आले.
यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक श्रीकांत निकाळजे, ज्येष्ठ शिक्षक सदाशिव तिगणे, हरित सेनेचे संचालक सतीश माने, क्रीडा संचालक बाबासाहेब भूजुगडे, दत्तात्रय राजमाने, राहुल जंगम, सच्चिदानंद जंगम, रघुनाथ माळी, धनंजय काळे, सुधाकर कांबळे, विजय शहापुरे, गजानन केरिपाळे, कल्पना पाटील, हेमलता माळी, सुनिता कुलकर्णी, सोमनाथ जंगम या मान्यवरासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
