Spread the love

पन्हाळा / महान कार्य वृत्तसेवा

पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळातून पहिल्या दिवशी उत्साह पूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. नवागत मुलांचे फुलांचा सडा, रथातून मिरवणूक, या सर्व विविध स्वागत तर कार्यक्रमाने शिक्षक आणि मुलांना शाळा शिकण्यास उत्साहित केले. दिड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर  शाळा सुरू झाल्या नव्या शैक्षणिक वर्षात उत्साही वातावरणात विदयार्थ्थांनी शाळेत हजेरी लावली.

पन्हाळा तालुक्यातील करंजफेण येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या विदयार्थ्थांचे  वाजत गाजत स्वागत केल्याने विदयार्थी भारावले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धर्मेद्र कांबळे, कोमल सागर कांबळे, मुख्याध्यापक अजित पाटील यांच्या हस्ते विदयार्थ्थांना शैक्षणिक साहित्य, खाऊ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी रविंद्र चौगुले, अनिता पाटील, मुख्याध्यापक अजय पाटील, सुनील लाड, संभाजी पाटील, राहुल शेटे,  सुनिता शिंदे, गंगाधर दहिफळे आदी उपस्थित होते.

कोलोली येथील केंद्र शाळा, नवगतांच्या स्वागतासाठी पन्हाळा पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी जयश्री जाधव यांच्या उपस्थितीत स्वागताचे विविध कार्यक्रम पार पडले. यामध्ये विद्यार्थ्यांना फेटे बांधून गावातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. शालेय गणवेश, वह्या पुस्तके, त्याचबरोबर गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले.

यावेळी सरपंच पवित्रा कांबळे, ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष सचिन पाटील, मुख्याध्यापक नितीन पाटील यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष ग्राम शिक्षण समितीचे सदस्य सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर आळवे, पिपळे, शेलारवाडी, कोतोली, वाघवे ,उत्तरे, माळवाडी, मानेवाडी, दिगवडे तिरपण सह पश्चिम पन्हाळ्यातील सर्वच शाळात त्या त्या गावातील शिक्षण समिती सदस्य सरपंच, उपसरपंच सर्व शिक्षक व प्रतिष्ठित नागरिकांनी हजेरी लावून नवगत विद्यार्थ्यांचे उत्साहाच्या वातावरणात स्वागत केले.