Spread the love

कोथळी करवीर / महान कार्य वृत्तसेवा (तानाजी पोवार)

महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास राज्य शासनाने मान्यता दिली. यामध्ये टोपी निळ्या रंगाची असून, त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाचा लोगो व नाव असेल. कामगार दिनाचे औचित्य साधून हा खाकी गणवेश १ मे पासून राज्यभरात अंमलात आणावे. यासाठी गणवेशाचे कापड पूर्तता करछनही काही आस्थापनेवर सुरक्षारक्षक जुनाच निळ्या रंगाचा गणवेश घालून वावरताना दिसत आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी होणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली अशा १५  जिल्ह्यांमध्ये विविध संपूर्ण सरकारी आस्थापना, नगर परिषद , महानगरपालिका सुरक्षेचा भार सांभाळणाऱ्या सुरक्षा रक्षक मंडळाने खाकीची लढाई अखेर जिंकली आहे. मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना आता खाकी गणवेश वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे सुरक्षा रक्षक निळ्या रंगाचा गणवेश वापरत होते. महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाकडे नोंदणी कृत असणाऱ्या सुरक्षारक्षकांना निळा गणवेश ऐवजी खाकी गणवेश मिळावा यासाठी भारतीय सुरक्षा रक्षक आणि श्रम कामगार युनियनने ही मागणी केली होती. यासाठी युनियनचे पदाधिकारी यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार व प्रत्यक्षात भेटून ही मागणी मोठ्या प्रमाणे उचलून धरली होती.

 गेले नऊ वर्षे हे सुरक्षारक्षक गणवेशाचा रंग बदलण्यासाठी लढा देत होते. राज्यातील महापालिका नगरपरिषद यांच्यासह इतर विविध आस्थापना सरकारी रुग्णालय, शाळा, जिल्हा परिषद एलआयसी ऑफिस जिल्हा न्यायालय, विद्यालय, महाविद्यालय आदींना सुरक्षा रक्षक मंडळाकडून सुरक्षा पुरविली जाते. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये या मंडळाचे सुरक्षा रक्षक कर्तव्य बजावत आहे. तसेच कोल्हापूर येथील महालक्ष्मीच्या मंदिराच्या सुरक्षेचा काही भागही याच सुरक्षा रक्षकांच्या खांद्यावर आहे. मात्र गणवेश निळ्या रंगाचा असल्याने लोकांवर त्यांची म्हणावी तशी छाप पडत नव्हती. मंडळाच्या मागून आलेल्या अनेक सुरक्षारक्षक एजन्सीच्या गणवेशाचा रंग प्यारा मिलिटरी करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या गणेशाचा मूळ रंग बदलून तो खाकी करावा अशी मागणी राज्यभरातील सुरक्षा रक्षकांकडून नऊ वर्षापासून केली जात होती. ही मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे व प्रत्येक जिल्ह्यातील सुरक्षक सुरक्षा रक्षक मंडळांना कापडाची प्रतिता करून एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या औचित्य साधून सर्व आस्थापनावर सर्व सुरक्षारक्षकांनी खाकी वर्दी वापर करावा अशी आदेश असताना, कोल्हापूर जिल्ह्यातील काही आस्थापनेवर जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा न्यायालय महापारेषण एलआयसी व अन्य ठिकाणी खाकी गणवेश मिळूनही अजून हे सुरक्षारक्षक निळ्या रंगाचा गणवेश वापर करताना दिसत आहे.

त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून लढाई करून मिळवलेला खाकी गणवेश वापरण्याकडे अजूनही सुरक्षारक्षकांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तर त्याचीही अंमलबजावणी होते का ? हे सुरक्षा रक्षक मंडळाचे मंडळाचे अध्यक्ष व अधिकाऱ्यांनी पाहणे गरजेचे आहे.