शित्तूर-वारुण / महान कार्य वृत्तसेवा
दोन दिवसापूर्वी शाहूवाडी तालुक्यातील उखळू पैंकी अबाईचा धनगर वाडा येथील श्री निनू काळू गावडे व बाळू काळू गावडे यांच्या राहत्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. त्यांत घराचे व प्रांपचिक साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचे घरी अज माथाडी कामगार सहयाद्री बँकेचे माझी व्हॉइस चेअरमन सुरेश पवार साहेब यांनी भेट दिली व त्यांना आर्थिक मदत म्हणून रोख रुपये दहा हजार रूपये देण्यात आले.
गावडे बंधू यांच्या राहत्या घरास आग लागून नुकसान झाल्याचे वृत विविध वर्तमानपत्रात प्रसिध्द झाले होते. त्यातून गावडे बंधू यांना मदतीचे अवाहन करण्यात आले होते. त्या अवाहनास प्रतिसाद तसेच एक मानवतेच्या भावनेतून ही मदत करण्यात येत असल्याचे सुरेश पवार यांनी सागितले. मुंबई येथे मदत जमा करण्याचे सुरू असल्याचेहि यावेळी सांगण्यात आले.
नुकसानग्रस्त गावडे बंधू यांना विविध ठिकाणाहून अन्नधान्याची, कपडालत्ता तसेच आर्थिक मदत करावी असे अवाहन यावेळी करण्यात आले. त्याप्रसंगी आंबाईवाडा येथील सर्व कामगार तसेच कामगार नेते प्रकाश कदम, जयवंत डफडे आणि समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
