Spread the love

इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

पंचगंगा नदीला महापूर आल्यानंतर सर्वात पहिला पुराचा फटका बसणारा भाग म्हणजे कटके गल्ली. पावसाळ्यापूर्वी सारणगटारीची स्वच्छता करण्याचे काम इचलकरंजी शहरात सुरू असतानाही शक्य गल्लीत मात्र, गटारी तुंबून रस्त्यावर पाणी साठलेले दिसत आहे. याबाबत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रमोद बचाटे यांनी सदर भागातील सत्तेचे काम तातडीने करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

इचलकरंजी शहरात कर्नाटकी बेंदूर सणाचा उत्साह भरात असताना वॉर्ड क्र. २ मधील कटके गल्ली परिसरातील नागरिक मात्र अस्वच्छतेच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. या भागात गटारीतील साचलेल्या घाण पाण्यामुळे दुर्गंधी, डासांचा उपद्रव आणि आरोग्य धोक्यात आले आहे. एकीकडे गाव आनंदात सण साजरा करत असताना  कटके गल्लीमधील नागरिक मात्र सणाच्या दिवशीसुद्धा घाण पाण्याच्या समस्येत अडकले आहेत. समस्येबाबत महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे यापूर्वीच लेखी व तोंडी निवेदने देण्यात आली आहेत. मात्र अद्यापही कायमस्वरूपी उपाय झालेले नाहीत.

गुरुवारी पुन्हा महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ.नितीन भाट,  सचिन भुते, किरण लाखे, वॉर्ड निरिक्षक तनवीर आगा आणि लालबेग यांनी देखील प्रत्यक्ष पाहणी करून तात्पुरत्या स्वरूपात गटारांची स्वच्छता केली. मात्र  पूर्ण साफसफाई होऊ शकली नाही, प्रशासनाने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा. अन्यथा  आंदोलन करण्याचा इशारा प्रमोद बचाटे यांनी दिला आहे.