जयंत पाटील काय म्हणाले? मुंबई मनपाच्या ठेवींवरूनही सरकावर हल्लाबोल
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का ? याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगलेली आहे. दुसरीकडे मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबई मनपाच्या ठेवींवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुंबई पालिकेच्या 92 हजार कोटी रुपयांच्या ठेवी होत्या .या ठेवी आता रिकाम्या होऊ लागल्या आहेत .2 लाख 36 कोटी रुपयांच्या वर्क ऑर्डर दिल्या आहेत मात्र यांच्याकडे द्यायला पैसा नाही .असलेल्या ठेवी मोडण्याची वेळ यांच्यावर आली आहे असे म्हणत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला.
आघाडीची एकत्रित लढायचं की वेगळं लढायचं याबाबत चर्चा झाली नाही. लवकरच त्याबाबत निर्णय होईल. अनेक जण इकडे तिकडे जातील त्या बातम्या येतील तुम्ही बेरजेच्या राजकारणावर फोकस करा. नव्या चेहऱ्यांना संधी द्या. सोशल मीडियावर लक्ष द्या तालुका जिल्हा पातळीवर आपला सोशल मीडिया कसा आहे यावर देखील लक्ष ठेवा. आपण करत असलेल्या कामाबाबत लोकांपर्यंत माहिती पोहचवा असंही शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
काय म्हणाले जयंत पाटील ?
मुंबई सहजासहजी आपल्याला मिळालेली नाही. आता मुंबईत असणारे पेटंट कार्यालय दिल्लीला गेले आहे. याच मुख्यालय आधी मुंबईत होतं आता 50 वर्षानंतर दिल्लीला गेले आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र देखील गुजरातला गेले आहे.
मनमोहन सिंग यांच्या काळात आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र याची कल्पना मांडण्यात आली. सगळ्या अर्थविषयक संस्था या केंद्राच्या अंतर्गत होते. हे कार्यालय मुंबईत होणार होते ते आता गुजरातला गेले आहे. वांद्रे कुर्ला काम्प्लेक्स साठी भूखंड राखीव ठेवण्यात आले होते. नॅशनल मरीन सिक्युरिटी हे देखील मुंबईत होणार होते आता हे देखील गुजरातला नेले आहे. मुंबईचा हिरेबाजार देखील गुजरातला गेला आहे. मुंबईच्या कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यायला हवी. मुंबई पालिकेच्या 92 हजार कोटी रुपये ठेवी होत्या. त्या खाली व्हायला लागल्या आहेत. 2 लाख 36 कोटी रुपयांच्या वर्क ऑर्डर दिल्या आहेत मात्र यांच्याकडे द्यायला पैसा नाही आता ठेवी मोडायची वेळ यांच्यावर आली आहे. असा हल्लाबोल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केलाय.
महाराष्ट्र सरकार मुंबईत 4 बोगदे करणार असं समोर आलं आहे मग मुंबई पालिका काय करणार आहे. पालिकेची कामे आता सरकार करणार आहे का? हे स्पष्ट व्हायला हव .परवा मुंबईत जोरदार पाऊस झाला यावर पालिका म्हणते पाऊस लवकर आला. कुठलीही आपत्ती आली तरी आपण तयार नाही. मुंबईत ट्रॅकवर लोकं पडली. 2 दिवस बातमी चालली आणि त्यानंतर बातमी बंद झाली. 9 मे पासून तिकीट बेस्टच डबल झालं यांच्याकडे 602 स्वत:च्या गाड्या आहेत बाकी सगळ्या भाड्याने आहेत. असेही ते म्हणाले.मुंबईत पिण्याच्या पाण्याचा प्रधान आहे. समस्या होती त्यावेळी कोणी जागे होतं नाही. लोकं एकत्र येतात आणि मोर्चा काढतात आणि त्यावर श्रेय घेण्यासाठी बाकी लोकं येतात.
समोरच्या भपकेगिरीला घाबरू नका…
आपल्या समोर मोठी आव्हान आहेत. पक्षाची दोन शकलं झाली मात्र मुंबईचे कार्यकर्ते कुठे गेले नाहीत 2-4 टक्के माणसं फक्त इकडे तिकडे गेली. लोकसभा झाल्यानंतर लोकं आमच्याकडे इकडे यायला लागली. फुटपाथवर सुद्धा प्रवेश करू लागली. गाड्या थांबवून प्रवेश घेऊ लागले. म्हणाले साहेबांना भेटून आलोय आम्हाला प्रवेश द्या. आम्ही सुद्धा त्यांना बुके दिला . काही दिवसांत विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यानंतर ते दिसायचे बंद झाले
तुम्ही समोरच्याना घाबरू नका ते फक्त बॅनरवर असतात. कुणाचा फोटो असणार हे देखील फिक्स आहे. समोरच्या भपकेगिरीला घाबरू नका. अद्याप आघाडीची एकत्रित लढायचं की वेगळं लढायचं याबाबत चर्चा झाली नाही. लवकरच त्याबाबत निर्णय होईल. अनेक जण इकडे तिकडे जातील त्या बातम्या येतील तुम्ही बेरजेच्या राजकारणावर फोकस करा. नव्या चेहऱ्यांना संधी द्या. सोशल मीडियावर लक्ष द्या तालुका जिल्हा पातळीवर आपला सोशल मीडिया कसा आहे यावर देखील लक्ष ठेवा. आपण करत असलेल्या कामाबाबत लोकांपर्यंत माहिती पोहचवा. असेही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
