प्रेयसीला प्रेमात पाडणाऱ्या तरुणाची हत्या, गुजरातचा प्रियकर थेट पुण्यात आला भेटायलं बोलावलं
पुणे / महान कार्य वृत्तसेवा
देहूरोड येथील थॉमस कॉलनी परिसरात प्रेमाच्या त्रिकोणातून एका अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. खून झालेल्या मुलाचा चुलत भाऊ देखील या घटनेमध्ये जखमी झाला होता. दिलीप मौर्या (वय 16, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) असे खून झालेल्या तरुणाचे नावे आहे तर त्याचा अल्पवयीन चुलतभाऊ गंभीर जखमी झाला आहे. सनी सिंग (वय- 19, रा. गंभीरपूर, जि. गोपालगंज, बिहार) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आपल्या मैत्रिणीसोबत दिलीप याचे सुरु असलेल्या प्रेम प्रकरणाचा सनी सिंगला राग होता. त्यावरून त्याने बुधवारी (ता. 11) रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास दिलीप याला थॉमस कॉलनी येथील मोकळ्या मैदानात बोलावून घेतले. दरम्यान, दिलीप याने त्याच्या चुलत भावाला सोबत नेलं होतं. ते थॉमस कॉलनीमध्ये गेल्यानंतर, सनी सिंग अन् दिलीप यांच्यात प्रेमसंबंधांतून मोठा वाद झाला. त्यातून सनी सिंग याने दिलीप याच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यावेळी त्याच्या चुलतभावावरही वार केला. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दिलीप याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती तर आरोपी सनी सिंग हा खासगी कंपनीत कामाला आहे.
मैत्रिणीने बोलणं बंद केलं अन्…
पुण्यातील देहू रोड येथील थॉमस कॉलनीत राहणाऱ्या सतरा वर्षीय दिलीप मोर याची धारदार चाकूने हत्या होती आणि त्याच्या चुलत भावाच्या पोटात वार करून गंभीर जखमी केल्याची घटना देहू रोड पोलिस स्टेशन परिसरात उघडकीस आली होती. देहूरोड पोलिस आणि युनिट पाचची टीम मृत दिलीपची हत्या कोणी आणि का केली हे शोधण्यासाठी कसून तपास अन् शोध घेत होती. पोलिस तपासात असे दिसून आले आहे की, दिलीपची हत्या प्रेमप्रकरणातून झाली आहे. दिलीप आणि त्याचा मारेकरी सनी सिंग राजपूत एका अल्पवयीन मुलीवर प्रेम करत होता. गेल्या तीन महिन्यांपासून तिने सनीशी बोलणे बंद केलं होतं आणि ती दिलीपच्या संपर्कात होती. दिलीपच्या संपर्कात असल्याने संतापलेल्या आरोपी सनी सिंग राजपूत थेट गुजरातमधून देहूरोड आला, तिथे त्याने दिलीपची हत्या केली. मृत दिलीपचा चुलत भाऊ अरुण मोर्या या चौदा वर्षीय मुलाच्या पोटात चाकूने वार करून सनी सिंगने त्यालाही गंभीर जखमी केलं त्यानंतर तो गुजरातला पळून गेला. दरम्यान पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला तेव्हा सनी सिंग राजपूतच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे सनी गुजरातमधील वडोदरा येथील एका स्टील कंपनीच्या गोदामात लपून बसल्याची त्यांना माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफिने त्याला अटक केली. पोलीस खाक्या दाखवतात.आरोपी सनी याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे.
पोलिसांनी घटनेबाबत काय सांगितलं?
अकरा तारखेला रात्री साडेदहा वाजताच्या दरम्यान सनी सिंग राजपूत याने दिलीप मोर्या याला माझ्या मैत्रिणी सोबत तुझे कसे काय प्रेम संबंध आहेत, तू तिच्याशी का बोलतो या रागातून भेटायला बोलावलं त्या ठिकाणी दोघांचे हातापायी झाली. त्यावेळी दिलीप मोर्या आणि त्याचा चुलत भाऊ अरुण मोर्या यांना जंगलात बोलून घेतलं, त्या दोघांशी सनी राजपूत भांडत होता, त्यावेळी सनीने चाकूने दोघांवरती वार केले. यादरम्यान दिलीपचा जागेवरच मृत्यू झाला. तर अरुण जखमी असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावरून पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या घटनेनंतर .राजपूत तिथून पळून गेला होता.पुणे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याचा माग काढत असताना तो गुजरातला पळून गेल्याची माहिती मिळाली. त्याला तात्काळ गुजरात वरून अटक करण्यात आली आहे, याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याला न्यायालयात हजर केला असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
