Spread the love

जेव्हा मुंबईच्या मधोमध कोसळलेलं विमान ; 5 जण दगावले पण पायलटनं वाचवला मुंबईकरांचा जीव; घाटकोपरमध्ये घडलेले काय?

अहमदाबाद / महान कार्य वृत्तसेवा

घाटकोपरमध्ये कोसळलेले विमान हे लहान आकाराचे म्हणजेच चार्टर विमान होते. हा अपघात 28 जून 2018 रोजी झाला होता. चाचणी उड्डाणादरम्यान म्हणजेच टेस्ट फ्लाईटदरम्यान किंग एअरचे सी-90 चार्टर विमान अपघातग्रस्त झाले होते. जुहू इथून टेस्ट फ्लाईटसाठी या विमानाने आकाशात झेप घेतली.

गुजरातमधील अहमदाबाद येथील मेघानीमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं आहे. इंग्लंडच्या दिशेनं जाणारं हे विमान उड्डाणानंतर चार मिनिटांमध्ये कोसळलं. या विमानामध्ये 242 प्रवासी प्रवास करत होते. ज्यापैकी 57 प्रवासी हे बिटीश होते. या विमान अपघातानंतर बचाव कार्याला सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे विमान रहिवाशी भागात कोसळल्याने मृतांची संख्या वाढू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या अपघाताच्या बातमीनंतर अनेकांना मुंबईमधील घाटकोपरसारख्या गजबजलेल्या परिसरामध्ये काही वर्षांपूर्वी विमान कोसळल्याच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. घाटकोपरमध्ये विमान कोसळलं तेव्हा नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊयात…

किती जणांचा मृत्यू?

मुंबईत झालेल्या अपघातात एकूण 5 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 2 पायलट, विमान देखभाल करणारे दोन इंजिनिअर्स तसेच एका प्रत्यक्षदर्शीचा समावेश होता. घाटकोपरसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या भागात एका निर्माणाधीन इमारतीजवळ हे विमान कोसळळं होतं. मुंबई विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असतानाच घाटकोपर येथे हे विमान कोसळले होते. मुंबईतील यूवाय एव्हिएशन कंपनीच्या मालकीचं विमान 2014 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने कंपनीला विकले होते.

आग लागली

घाटकोपर पश्चिम परिसरातल्या शंकर सागर इमारतीपासून हाकेच्या अंतरावर हे विमान कोसळलं. घाटकोपरमध्ये हे विमान कोसळले त्यावेळी मोठा स्फोट झाला. विमान ज्या ठिकाणी कोसळलं तिथे एका झाडाला आग लागली. त्यानंतर ही आग पसरत गेली. विमानावरील नियंत्रण सुटत असल्याचं लक्षात आल्यानंतर पायलेटने विमान निर्जनस्थळी नेण्याचा पूर्ण प्रयत्न केल्याने हे विमान कमी गर्दीच्या ठिकाणी कोसळलं. विमान बांधकाम सुरू असलेल्या निवासी संकुलाच्या भिंतीवर आदळले आणि मोठी आग लागली. या परिसरामध्ये विमानाचं इंधन पसरले होते.

बरंचसं विमान जळून खाक

अग्निशमन दलाच्या तुकड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. मात्र विमानातील इंधन अधिक ज्वलनशील असल्याने अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी विमानाचे इंजिन, प्रोपेलर आणि लँडिंग गेअर पूर्णपणे जळून खाक झाले होते.