Spread the love

पोलिसांकडून वाहन चालकांचा डब्बल गेम

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा (संतोष पाटील)

पोलिसांच्या तावडीत सापडलं आणि त्यातून सहजासहजी सुटका झालेली आहे असे ऐकिवात नाही. वाहनधारकांना अडवायचं खात्या दाखवायचा आणि तडजोडीच करून रोकड खिशात घालायची त्यानंतर गाडीचा फोटो काढून चलन पडायचे, असा डबल महसूल उकळण्याचा उद्योग इचलकरंजीतील पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, या संदर्भात वाहनधारकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. परंतु वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे अजिबात लक्ष दिले नाही. यामुळे अशा वशिलीवास पोलिसांचं फावत असा संताप जनक सवाल डब्बल गेम झालेल्या वाहनधारकातून व्यक्त होत आहे. शुक्रवारी आठवडी बाजार या बाजारादिवशी ग्रामीण भागातील  शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी आणि तो खरेदी करण्यासाठी ग्राहक इचलकरंजी शहरात येतात, दुपारच्या सुमारास थोरात चौक येथे बाजारानिमित्त मोटरसायकल वरून लोक आले होते. येथे चौकात बंदोबसासाठी उपस्थित असलेल्या एका पोलिसाने तरुणांची मोटरसायकल अडवली आणि आडवे तिडवे प्रश्न विचारून त्या तरुणांना भंडावून सोडले.

तरुणांची चलबिचल सुरू झाली आता यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. या विचाराच्या गर्दीत ते तरुण रेंगाळत त्याच ठिकाणी राहिले सहावच टप्प्यात आल्याचे पोलिसाच्या लक्षात आले आणि त्याने आपला डाव टाकला. 500 च डिमांड टाकत सौदा पक्का केला. त्या दोन तरुणांनी एकमेकांच्या खिशातील झाडून सारी रोकड त्या पोलिसाच्या हातात ठेवली. परंतु त्या पट्ट्याने इतकं करू नये, त्यांना अजिबात सोडलं नाही. गर्दी कमी झाल्याचा अंदाज आल्यानंतर महसूल उखळण्यासाठी त्याच्याकडे दिलेल्या मोबाईलवर त्या गाडीचा फोटो काढला आणि पाचशे रुपयाचे ऑनलाइन चलन फाडले. त्या तरुणांना मोबाईलवर मेसेज आल्यानंतर त्यांनी रोकिरे फाशी दिली असताना परत ऑनलाईन चलन कसं काय असा उलट सवाल केल्यानंतर त्याची सटकली आणि थेट मोटरसायकल सह त्या तरुणांना तिथूनच जवळ असलेल्या पोलीस ठाण्याच्या आवारात आणून ठेवलं. तब्बल दोन तासानंतर त्या तरुणांना सोडण्यात आलं. या घटनेची कानोकान खबर वरिष्ठांना लागू दिली नाही हे विशेष.

पोलिसांचा पगार वाढवा

आमची चूक नसतानाही पोलिसांच्या दमबाजीमुळे आम्ही दंड म्हणून पाचशे रुपये रोखीन दिले. तरी त्या पोलिसांनी ऑनलाईन चलन फाडले आमचा डबल गेम केला. अशा पोलिसांचा शासनाने पगार वाढवा आणि सर्वसामान्य नागरिकांची होणारी थांबवावी, अशी आमची मागणी आहे.