Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

भारताला एकेकाळी सोने की चिडिया म्हटले जाते. देशात अनेक ठिकाणी सोन्याच्या खाणी आहेत जिथून मोठ्या प्रमाणात सोन्याचे साठे सापडले आहेत. स्वातंर्त्यापूर्वी, अशीच एक खाण कर्नाटकात होती जिथून शेकडो टन सोने काढले जात होते. या खाणीमुळं बिटिशांना अगदी मालामाल बनवले होते. कर्नाटकातील कोलार गोल्ड फील्ड्‌‍स (ख्उइ) 79 वर्षांनंतर पुन्हा उघडली जाणार आहे. स्वातंर्त्यानंतर ही सोन्याची खाण पुन्हा उघडली जाईल. जर येथे सोन्याचा मोठा साठा सापडला तर देशाला लाखो कोटींचा फायदा होऊ शकतो.

या सोन्याच्या खाणीतून (ख्उइ) दरवर्षी सुमारे 750 किलो सोने काढता येते. यामुळे सोने खरेदीसाठी भारताचे इतर देशांवरील अवलंबित्व कमी होईल आणि परकीय चलनाची बचत होईल. भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक आहे, देशात सोन्याच्या दागिन्यांची मागणी इतकी जास्त आहे की भारताला दरवर्षी शेकडो टन सोने खरेदी करावे लागते. केजीएफ सुरू केल्याने लाखो कोटी रुपये वाचणार आहेत.

बिटिशांच्या काळात कोलार गोल्ड फील्ड ही सोन्याची सर्वात मोठी खाण होती. बिटीश राजवटीत येथून दरवर्षी शेकडो टन सोने काढले जात असे. 1880 पासून 120 वर्षांत येथून सुमारे 900 टन सोने काढण्यात आले. परंतु 2001 मध्ये येथे खाणकाम बंद करण्यात आले होते. कोलार गोल्ड फिल्ड्‌‍स एकेकाळी गोल्ड सिटी, सोन्याचे शहर किंवा मिनी इंग्लंड म्हणून ओळखले जात असे.

कोलारमध्ये मोठ्या प्रमाणात आढळलेल्या सोन्याच्या साठ्यांचा उल्लेख चोल सामाज्यातही आढळतो. चोल सामाज्याच्या काळात 1004 ते 1116 या काळात शिलालेख आणि पुस्तकांमध्ये सोन्याच्या खाणीचा उल्लेख आहे. विजयनगर राजवंशाच्या काळातही येथे सोने काढले जात होते आणि म्हैसूरचा शासक टिपू सुलतान याने 1750 ते 1760 च्या दरम्यान सोन्याच्या खाणीचा वापर केल्याचा उल्लेख आहे.

बिटनने भारतावर ताबा मिळवल्यानंतर, लेफ्टनंट जॉन वॉरेन यांनी 1802 मध्ये कोलार खाणींमध्ये सोन्याचे साठे उत्खनन करण्यास सुरुवात केले. 1804 ते 1860 दरम्यान कोलार गोल्ड फील्डमध्ये उत्खनन सुरू झाले. 1880 मध्ये इंग्रजी कंपनीने कोलारमध्ये सोने काढण्यास सुरुवात केली. स्वातंर्त्याच्या काही वर्षांपूर्वी, 1943 पर्यंत, केजीएफमधून 583 टन सोने काढले होते आणि त्यांचा खजिना सोन्याने भरला होता.

स्वातंर्त्यानंतर, कर्नाटक सरकारने केजीएफचे नियंत्रण आपल्या हाती घेतले. जॉन टेलर अँड सन्स यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. पण 1972 मध्ये केंद्र सरकारने सोन्याच्या खाणी केजीएफकडे सोपवल्या. जेव्हा बीजीएमएलचा तोटा वाढू लागला आणि सोन्याचे उत्खनन कमी झाले, तेव्हा 2001 मध्ये ते बंद करण्यात आले.