नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी याला 9 जून 2025 रोजी घ्ण्ण् हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आलंय. 43 वर्षीय धोनीनं आपल्या 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 17,000 हून अधिक धावा केल्या असून भारताला तीन घ्ण्ण् ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. या सन्मानाबद्दल धोनीनं आनंद व्यक्त करत हा क्षण आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असल्याचं सांगितलं.
धोनीची कारकीर्द
झारखंडचा 43 वर्षीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याला सोमवार, 9 जून 2025 रोजी घ्ण्ण् हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळालं. धोनीनं आपल्या 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामन्यांमध्ये 17,266 धावा केल्या आणि 829 बळी घेतले. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं 2007 चा टी-20 विश्वचषक, 2011 चा एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनी हा एकमेव कर्णधार आहे, ज्यानं घ्ण्ण् च्या तिन्ही मर्यादित षटकांच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याच्या नेतृत्वात भारतानं कसोटी क्रमवारीतही अव्वल स्थान मिळवलं आणि अनेक कसोटी मालिका जिंकल्या.
यापूर्वी कोणाला मिळाला मान?
घ्ण्ण् हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारा धोनी हा 11 वा भारतीय क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, राहुल द्रविड यांसारख्या दिग्गजांना हा सन्मान मिळाला आहे. धोनीनं घ्ण्ण् ला सांगितलं, ”घ्ण्ण् हॉल ऑफ फेममध्ये माझं नाव समाविष्ट होणं हा एक सन्मान आहे. क्रिकेटमधील महान खेळाडूंसोबत माझं नाव जोडलं जाणं ही एक अविस्मरणीय भावना आहे. हा क्षण मी नेहमीच जतन करेल.”
कधी झालं पदार्पण
धोनीनं 23 डिसेंबर 2004 रोजी बांगलादेशविरुद्ध चटगांव येथे एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. त्यानं 350 एकदिवसीय सामन्यांत 10,773 धावा, 90 कसोटी सामन्यांत 4,876 धावा आणि 98 टी-20 सामन्यांत 1,617 धावा केल्या. 15 ऑगस्ट 2020 रोजी त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, परंतु तो अजूनही चेन्नई सुपर किंग्सकडून इंडियन प्रीमियर लीग मध्ये खेळतो. खझङ 2025 साठी ण्एख् नं त्याला 4 कोटींना कायम ठेवलं होतं. 11 एप्रिल 2025 रोजी त्यानं ण्एख् चं कर्णधारपद पुन्हा स्वीकारलं.मात्र, खझङ 2025 मध्ये उडघ ला अपेक्षित यश मिळालं नाही आणि संघ प्रथमच गुणतक्त्यात तळाशीच राहिला.
इतर दिग्गजांनाही सन्मान
धोनीसोबतच ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम अमला, न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि फिरकीपटू डॅनियल व्हेटोरी आणि पाकिस्तान महिला संघाची माजी कर्णधार सना मीर यांनाही घ्ण्ण् हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळालंय.
धोनीचा भारतीय क्रिकेटमधील वारसा धोनीनं भारतीय क्रिकेटला नवी दिशा दिलीय. 2005 मध्ये पाकिस्तानविरुद्ध विशाखापट्टणम येथे 148 धावांची खेळी आणि जयपूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध 183 धावांची नाबाद खेळीमुळं त्याची क्षमता सिद्ध केली. 183 धावांचा स्कोअर आजही एकदिवसीय क्रिकेटमधील यष्टीरक्षकाचा सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर आहे. 2007 च्या टी-20 विश्वचषकात त्यानं नव्या संघासह पाकिस्तानला हरवत भारताला विजेतेपद मिळवून दिलं होतं. त्याच्या नेतृत्वात भारतानं 2014 चा टी-20 विश्वचषक अंतिम सामना आणि 2016 चा उपांत्य सामना खेळला होता. कसोटी क्रिकेटमध्येही डिसेंबर 2009 मध्ये भारत त्याच्या नेतृत्वात प्रथमच क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला होता. त्याच्या आक्रमक आणि निडर फलंदाजी शैलीनं चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 224 धावांची खेळी आणि लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध 76 धावांची लढाई ही अविस्मरणीय ठरली.
