मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा अशी मोठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाच्या वर्धापन दिनीच केली आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना, दोन्ही राष्ट्रवादीचे वेगवेगळे वर्धापन दिन सोहळे होत आहेत. अशातच आता जयंत पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची मागणी शरद पवारांकडे केल्याने, राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
‘मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे.
हा पक्ष स्थापन झाला त्यावेळी शिवाजी पार्कमध्ये लाखोंचा जनसमुदाय पवार साहेबांची भूमिका ऐकण्यासाठी एकत्रित आले. 1999 पासून 2014 पर्यंत सतत पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत राहिला. या राज्याच्या जडणघडणीतले अनेक निर्णय सत्तेत असताना या पक्षातल्या सगळ्या धोरणांना घेण्याचं काम केलं. या 14 वर्षाच्या कालखंडात 15 वर्षाच्या कालखंडात पक्षही अतिशय सामर्थ्याने वाढवण्याचे काम झालं. पण 14 साल उजाडले भाजपची सत्ता आली आणि बरीच लोकं आमच्या रेल्वेतून उतरून दुसऱ्या रेल्वेत जाऊन बसायला लागेल. पण आपण सगळे पवार साहेबांच्या मागे निष्ठेने राहीलो. तुमचं कौतुक मला यासाठीच आहे की अनुकूल असो प्रतिकूल असो, यश मिळो अथवा न मिळो तुम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना आयुष्यभर साथ दिली आणि म्हणून संख्ये पेक्षा गुणवत्तेला महत्व असतं.
सुप्रिया ताईंनी सिंदूर आ?परेशन बद्दल भुमिका मांडली. त्यांचं अभिनंदन. आपले पक्षीय मदभेद असतील मात्र परराष्ट्र धोरणाचा प्रश्न येतो तेव्हा या देशाच्या संरक्षणाची भूमिका पुढे मांडावी लागते. त्या ठिकाणी आपल्या पक्षाने आणि आदरणीय पवार साहेबांनी आम्हा सगळ्यांना सांगितलेले आहे की देश हिताची भूमिका ही सर्वप्रथम घेतली पाहिजे. शत्रूला धडा शिकवण्याची वेळ येते त्यावेळी देश एकसंघ असला पाहिजे आणि म्हणून तेव्हा तेव्हा आम्ही या देशाच्या कायम बरोबर राहण्याचं काम पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यात केलं. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला प्रचंड यश मिळालं. देशाचे मानकरी बहुतेक सगळे खासदार आज व्यासपीठावर आहेत. आपल्या सगळ्यांनी मेहनत घेतली आणि हा निकाल लागला.
डॉक्टर अमोल कोल्हे बसलेले आहेत त्यांनी फुटीनंतर पॉडकास्ट सिरीज सुरू केली. अमोल कोल्हे यांच्या सोबतचा पॉडकास्ट होता सुप्रियाताई, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, मी असेल आम्ही सगळ्यांची मुलाखत अमोल यांनी त्यावेळी अतिशय परखडपणाने घेतली आणि आमच्या पक्षाची फुट झाल्यानंतरची आमची भूमिका पोहचवण्याचं काम झालं.
2019 ला लोकसभेच्या वेळी चार खासदार निवडून आले. बारामती, सातारा, रायगड आणि शिरूर पुन्हा आम्ही सगळे विधानसभेच्या कामाला लागलो. विधानसभेच्या कामाला लागल्यावर एक दिवस पवार साहेबांना नोटीस दिल्यावर पवार साहेब म्हटले मला काय बोलवता मीच येतो ना तुमच्याकडे. ईडीने नोटीस दिली तेव्हा पोलिस घरी येवून सांगायला लागले येवू नका.
ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम अशी आहे. आपण तुकारामांच्या बाजूचे आहोत. भाजपचे आधी दोनच खासदार होते. आज तो देशातील मोठा पक्ष आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र काम करत रहायचंय . राज्याचं नेतृत्व आपण करु.
आम्ही पदाधिकारी यांना निमंत्रण दिलं. कार्यकर्ते नाराज झाले. फोन आले. पावसाळ्याच्या कार्यक्रमाला सगळ्यांना बोलवून त्यांची अडचण नको म्हणून बोलवलं नाही. प्रशांतने वेळ घेतली म्हणून पुण्यात कार्यक्रम. चांगलं त्याचं कौतुक. त्रुटींची जबाबदारी माझी.
आता शिवभोजन थाळी बंद झाली आहे. अनाथांचे पैसे वळवण्याचं काम सरकारकडून होतंय. दोन कोटी रुपये एका पीएकडे सर्किट हाऊसला सापडले. जाहिर फक्त 2 कोटी झाले. तीन वर्षे प्रशासकाकडून महापालिका चालवल्या जात आहेत. मला शंका आहे जळगावला निवडणूक होणार नाही.
पवार साहेबांना शिव्या घालायच्या, मग मूळ प्रश्न बाजूला राहतो… आता विनाकारण टीका पवार साहेबांवर चालू आहे. ओबीसींचं संरक्षण करण्याचं काम पवार साहेबांनी केलं आजही त्यांची हीच भूमिका आहे. आव्हाड जी… अभी भी पवार साहब का डर है. न्यायाधिशाकडे पैसे सापडले काहीच कारवाई नाही.
