जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा
जयसिंगपूर, उदगाव, नांदणी, धरणगुत्ती, निमशिरगाव, तमदलगे, चिपरी, जैनापूर, कोंडिग्रे, जांभळी, हरोली या परिसरात वट पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
गावातील असलेल्या चौकातील व विविध ठिकाणी असलेल्या वडाच्या झाडाची महिलांनी विधिवत पूजन केले व 7 फेर्या मारून प्रार्थना केली. वट पौर्णिमेनिमित्त महिलांनी विशेष आकर्षक अशी वेषभूषा अनेक महिलांनी नऊवारी साडीला प्राधान्य दिल्या होत्या. त्याचबरोबर वट पूजन्याच्या ठिकाणी विडीओ आणि फोटो काढत होत्या. फोटोचाही मोह महिलांनी आवरला नाही. सकाळी 8 वाजल्यापासून अनेक गावात वडाचे झाड पूजन्यासाठी गर्दी झाली होती.
