शिरोळ / महान कार्य वृत्तसेवा
शिरोळ तालुक्यातील क्षय रुग्णांना शिरोळ येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.एन.पी.बनगे, डॉ.व्ही.डी.चव्हाण व डॉ.वाय.एम.मंगसुळे यांनी प्रत्येकी एक याप्रमाणे औषधोपचारावर असणार्या रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना फूड किट देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीबी मुक्त भारत या मोहिमेचा भाग म्हणून व टीबी रुग्णांना सकस आहार मिळावा. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत कार्यक्षेत्रातील टीबी रुग्णांना फूड किट मिळावेत. त्यासाठी दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करावी, या जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पांडुरंग खटावकर यांचे आवाहनास शिरोळ ग्रामीण रुग्णालयाच्या याप्रसंगी विजय कांबळे, यशोधन कुंनुरे, विश्वासराव डुबल, रमेश देवकाते, रणजित कांबळे, कृष्णा मस्के, संदीप तकडे, विजया अवसरे इत्यादी उपस्थित होते.
