इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
तीन अल्पवयीन शाळकरी मुलींना पाहत नग्न होऊन लैंगिक हावभाव केल्याप्रकरणी नागरिकांनी एकाला चांगलाच चोप दिला. अविनाश सिताराम शिंदे (वय 52 मुळ रा. मोहिते गल्ली, सांगलवाडी, सध्या रा.इचलकरंजी ता.हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. नागरिकांना त्याला शहापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला अटक करून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
संशयिताच्या घरासमोर तीन मुली खेळत होत्या. दरम्यान त्याने घराच्या दरवाज्यातच नग्न होत मुलींना लैंगिक हावभाव करत राहिला. याबाबत परिसरातील नागरिकांनी जाब विचारत शिंदे याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.
