इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने उद्योजकाकडून तब्बल ३ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुख्य संशयित स्नेहा नारकर हिला शहापूर पोलिसांनी अटक केली. नारकर हिला लक्ष्मीपुरी पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली होती. शहापूर पोलिसांनी तिचा ताबा घेतला आहे.
नारकर हिला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यामुळे तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. तर अन्य संशयित शांताबाई वाळकुंडे (इचलकरंजी), संतोष पाटील (चिपरी), शेखर गाडेकर (जयसिंगपूर) व वाहनचालक रामचंद्र हे कर्नाटकात पसार झाले असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दिली.
xr:d:DAF6HmZ6H0I:1957,j:1645363695027783817,t:24040516 