Spread the love

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

इचलकरंजी येथील डीकेटीई सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकच्या कॅम्पस मधुन २४ विद्यार्थ्यांची  स्पार्क मिंडा लि., पुणे या कंपनीत वार्षिक  ३.५ लाख पॅकेजवर निवड झाली  आहे. पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील आकांक्षा  कांबळे, कविता महाजन, प्रणाली पाटील, अनिरुद्ध सुर्यवंशी, यल्लमा करणी, संजना नलवडे, धनश्री कोपर्डेकर, मोहम्मद साद शेख, तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरींग मधील ओंकार दराडे, संजना चौगुले, ओंकार पाटील, सत्वेश आवळे, सार्थक फासे, तनुजा पोवाडी, तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मधील प्राची वागरे, साक्षी जाधव, रुतुजा पाटील, श्रृतिका लोंढे, वैश्नवी शिंदे, श्रध्दा  जगदाळे, श्रेया पाटील, अंजली पोवार, भक्ती  हालंडे, निलेश सकपाळ अशी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व संचालकांचे सहकार्य लाभले.

सदरच्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.ए.पी.कोथळी, डीकेटीईच्या कार्यकारी संचालिका डॉ. एल. एस. आडमुठे,  उप प्राचार्य प्रा. बी. ए. टारे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. एम. बी. चौगुले, विभाग प्रमुख व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.