माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूती यांनी घेतली नगर विकास विभागाचे आवर सचिव अशोक लक्कस यांची भेट
इचलकरंजी विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी महापालिकेच्या प्रभाग रचने संदर्भात माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते नगरविकास अवर सचिव अशोक लक्कस यांची भेट घेतली. चार वर्षांपासून लोकप्रतिनिधी पालिकेत नसल्यामुळे लोकांची मोठी कुसुमना होत आहे. लोकहिताची कामे होत नाहीत, यासाठी तातडीने प्रभाग रचना करून निवडणूक प्रक्रिया सुरू करावी, अशी विनंती रजपुते यांनी लक्कस यांच्याकडे केली आहे.
नगरपालिका, महानगरपालिका निवडणूक संदर्भातील कामासंदर्भात रजपुते यांनी लक्कस यांच्यासोबत दीर्घकाळ चर्चा केली. तर चर्चेदरम्यान प्रभाग रचने संदर्भात लवकरात लवकर हालचाली कराव्यात अशी विनंती केली. यावेळी पुढील आठवड्यात महाराष्ट्रातील नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत व जिल्हापरिषद प्रभाग रचने संदर्भातील आदेश निघतील व निवडणुका लवकरच होतील, अशी माहिती लक्कस यांनी दिली.
