कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा
मल्हार सेनेच्या वतीने धनगर समाजातील दहावी, बारावीसह विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी किमान ६० टक्के च्या वरती गुण मिळविलेल्यांनी गुणपत्रकासह लेखी अर्ज करण्याचे आवाहन सरसेनापती बबनराव रानगे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मल्हार सेनेच्यावतीने धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी दहावी व बारावी मध्ये किमान ६० टक्केच्या वरती गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज मागविण्यात आले आहे. तसेच कला, क्रिडा व शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविलेल्यांनीही मल्हार सेनेचे प्रसिध्दी प्रमुख बाबूराव बोडके, १२०५ ए वॉर्ड धनगर कॉलनी, लक्षतिर्थ वसाहत या पत्त्यावरती गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रतीसह लेखी अर्ज पाठवावेत किंवा ८७८८५९२८२५ या फोन नंबरवरती संपर्क साधावा. असे आवाहनही रानगे यांनी केले आहे.
