Spread the love

पुलाची शिरोली / महान कार्य वृत्तसेवा

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्यावरती गायलेल्या गौरव गीताचे प्रकाशन झरे गेस्ट हाऊस पडळकरवाडी ता.आटपाडी जि.सांगली येथे जतचे आमदार  गोपीचंद पडळकर  यांच्या हस्ते पार पडले.

या गीतासाठी मार्गदर्शन आमदार गोपीचंद पडळकर यांचे लाभले होते. निर्मिती आणि संकल्पना डॉ. रजनी गोरड व प्रा. मयुरेश गोरड यांनी केले आहे. लेखन व दिग्दर्शन  प्रल्हाद पाटील व संगीत दिग्दर्शक  विक्रम पाटील यांनी केले आहे. ध्वनिमुद्रण झंकार स्टुडिओ कोल्हापूर या ठिकाणी केले आहे. तसेच विशेष सहकार्य डॉ.विजय गोरड यांचे लाभले.

यावेळी प्रमुख उपस्थिती गायिका डॉ. वैष्णवी गोरड, पडळकर वाडीच्या सरपंच हिराबाई (नानी) पडळकर, डॉ.विजय गोरड, धोंडीराम सिद्ध, जगन्नाथ माने, अण्णा सिद्ध, संपत रुपणे, शहाजी सिद्ध, वैभव हिरवे, संजय काळे, सोमाजी वाघमोडे, सोहम गोरड इत्यादी उपस्थित होते. स्वागत चंद्रकांत कोळेकर यांनी केले व आभार योगेश पडळकर यांनी मानले.