Spread the love

डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे, मार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

तारदाळ / महान कार्य वृत्तसेवा

कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित कृषी समृद्ध अभियाना’ अंतर्गत  तारदाळ येथे नुकतेच चर्चासत्र आयोजित केले होते .ऊस उत्पादनात पाचट व्यवस्थापन ही एक महत्त्वाची प्रक्रिया असून, ती जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख जयवंत जगताप यांनी ऊस, सोयाबीन व भुईमूग उत्पादन तंत्रज्ञानाविषयी सखोल मार्गदर्शन केले.

ते म्हणाले, ऊस उत्पादनात पाचट व्यवस्थापन ही एक महत्त्वाची प्रक्रिया असून, ती जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. उसाचे पाचट जाळण्याऐवजी त्याचा जमिनीतच सेंद्रिय खत म्हणून वापर केल्यास जमिनीचा पोत सुधारतो, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि सूक्ष्मजीवांची क्रिया सुद्धा वाढते.शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना  जयवंत जगताप यांनी  सविस्तर उत्तरे दिली.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद -पुष्प विज्ञान अनुसंधान निदेशालय पुणे डॉ बशीत रझा, वैज्ञानिक यांनी शेतकऱ्यांनी जमिनीची खरी गरज ओळखून खत व्यवस्थापन करणे गरजेचे शेतीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची खरी गरज ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्नद्रव्यांची कमतरता किंवा अतिरेक टाळण्यासाठी जमिनीचा आरोग्य अहवाल पाहूनच खतांचा वापर करावा, असे तज्ज्ञांनी सांगितले.कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे चे शास्त्रज्ञ  दिपक पाटील आणि राजवर्धन सावंत भोसले, प्रा. दिपाली मस्के उपस्थित होते.

सरपंच प्रतिनिधी रणजीत पोवार, रमेश परीट मंडळ कृषी अधिकारी हातकणंगले, सहाय्यक कृषी अधिकारी सचिन आलमाने, बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष बाबासो महाजन, कृषी मित्र राजेंद्र बन्ने व प्रगतिशील शेतकरी भाऊसाहेब वास्के , अशोक गायकवाड यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.