इचलकरंजीत लाभार्थ्यांना मंजूरी पत्रांचे वाटप
इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
शिवसेना इचलकरंजी शहराच्यावतीने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना तसेच वयश्री योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते मातोश्री कार्यालयात करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख रवींद्र माने म्हणाले की, विरोधक लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची अफवा पसरवत होते, मात्र प्रत्यक्षात राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात दरमहा 1500 रूपयेजमा होत आहेत. तसेच ‘लाडका भाऊ’ योजना सुद्धा कार्यान्वित करण्यात आली असून राज्य सरकार सामाजिक न्यायासाठी कटिबद्ध आहे, असे त्यांनी नमूद केले. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना सध्या 1500 रूपये मिळत असून लवकरच हा निधी वाढवून 2000 रूपये करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. या कार्यक्रमाला अनेक लाभार्थी उपस्थित होते आणि त्यांनी शासनाच्या या उपक्रमांचे स्वागत केले.
यावेळी पंडित माने, माजी नगरसेवक इकबाल कलावंत, शिवसेना शहराप्रमुख भाऊसो आवळे, भाऊसो वठारे, अमर बुचडे, वैशाली डोंगरे, सलोनी शिंत्रे, विशाल माने, विलास माने, रमेश काळे, सुशील खैरमोडे, विनायक काळे, राहुल जाणवेकर, राहुल पाटील राजू लायकर, मंगल वरुटे, राजेंद्र हजारे, सुशील शिंदे, रवींद्र लायकर, अप्पासो इलाज, कमळ काजवे, संदीप माने, विशाल, कांबळे, अमित शिरगुडे, सीडी लडके, आदींसह ज्येष्ठ महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
