इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी येथील इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने कर्नाटक बेंदूर सणाच्या निमित्ताने आयोजित लाकूड ओढण्याच्या शर्यतीत रविवारी झालेल्या मोठ्या गटात सौरभ आनंदा माने यांच्या बैलाने 32.5 सेकंद अशी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकविला. दरम्यान, सोमवार 9 रोजी सुट्टा बैल पळविणे शर्यत तर मंगळवार 10 जून रोजी श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह चौकात जनावरांचे भव्य असे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
मोठ्या गटात प्रथमेश विनायक गायकवाड (34.7) यांच्या बैलाने द्वितीय तर श्रृतेश सुभाष चौगुले (35.5) यांच्या बैलाने तृतीय क्रमांक मिळविला. शासन नियमांचे पालन करुन शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. कोणताही गोंधळ वा अनुचित प्रकार घडू नये तसेच शर्यतीचा आनंद सर्वांचा लुटता यावा यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. याप्रसंगी चल भावा सिटीत चा विजेता पै. ऋषिकेश चव्हाण याचीही प्रमुख उपस्थिती होती.
प्रगतशील शेतकरी मुरलीधर कदम, आमदार राहुल आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आणि कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांच्या अध्यक्षतेेखाली मैदान पुजनाने शर्यतीचा शुभारंभ करण्यात आला. शर्यती पाहण्यासाठी तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होती. 12 जून रोजी जुनी गावचावडी गावभाग येथे होणार्या पारंपारिक कर तोडण्याच्या दिवशी सर्वच गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे दिली जाणार आहेत.
मैदानात माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश दत्तवाडे, सौ. मौश्मी आवाडे, इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते, उपाध्यक्ष नंदू पाटील, अहमद मुजावर, डॉ. विजय माळी, शांताप्पा मगदूम, पापालाल मुजावर, राहुल घाट, शेखर शहा, तानाजी भोसले, शिवाजी काळे, बाबासाहेब रुग्गे, राजेंद्र बचाटे, नरसिंह पारीक, शिवाजी माळी, सागर मगदूम, बजरंग कुंभार, राजू दरीबे, किशोर पाटील, सागर कम्मे, इरफान अत्तार, सागर गळदगे आदींसह असंख्य शर्यतप्रेमी उपस्थित होते.
