oplus_0
Spread the love

शित्तूर-वारुण / महान कार्य वृत्तसेवा

शित्तूर वारुण पैकी विठ्ठलाई धनगरवाडा येथील भागोजी गावडे प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय सैन्यदलात दाखल. पंचक्रोशीतून धनगर बांधवानी भव्य स्वागत मिरवणूक काढली.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मंगलदास मार्केट मुंबई  येथे माथाडी कामगार म्हणून काम करणाऱ्या बबन गावडे यांचा मुलगा भागोजी गावडे सण 2024 मध्ये झालेल्या सैन्यदलाच्या भरतीमध्ये यशस्वी झाला होता.  तो प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर समस्त धनगर बांधव आणि ग्रामस्थांच्यावतीने मिरवणूक काढून भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागात असणाऱ्या शित्तूर-वारुण पैकी विठ्ठलाई धनगरवाडा हि वस्ती गावापासून सुमारे पाच ते सात किलोमीटर अंतरावर चांदोली अभयारण्या शेजारी वसलेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत या वस्तीवर जाण्यासाठी अजूनहि पक्क्या रस्त्याची सुविधा उपलब्ध झालेली नाही. रोजगार आणि मोलमजुरी करून शिक्षण घेत कोणत्याही आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध नसताना  जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भागोजीने सैन्य भरतीमध्ये यश संपादन केल्यामुळे समाजातून त्याच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याच्या या यशामुळे शिक्षण घेत असलेल्या वाडी-वस्तीवरील विध्यार्थी वर्गापुढे आदर्श निर्माण झाला आहे.