Spread the love

इचलकरंजी विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

इचलकरंजी महानगरपालिका नगर पथविक्रेता समितीवर इचलकरंजी शहर फेरीवाला विकास आघाडीचे पॅनेल निवडून आलेला आहे. कारण सर्व झेंडे बाजूला ठेवून आम्ही एकत्र येऊन ही निवडणूक लढवलेली आहे. त्यामुळे या यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा समावेश नाही. बिन राजकीय पक्षाचा अजंटा आम्ही राबवत आहोत. असे पत्रक कॉम्रेड सदाभाऊ मलाबादे मध्ये यांनी प्रसिद्धीस दिल आहे.

1986 साली कॉम्रेड के. एल. मलाबादे यांनी सर्व राजकीय पक्षाची मूठ बांधून नागरिक आघाडी स्थापन केलेली होती. तोच धागा पकडून आम्ही इचलकरंजी शहरांमध्ये गटातटाच राजकारण बाजूला ठेवून शहर फेरीवाला विकास आघाडीच्यावतीने निवडणूक लढवलेली आहे. पतविक्रेता समिती ही सर्वपक्षीय आहे. यात कोणत्याही राजकीय पक्षाचा अजेंडा नाही, असे मलाबादे यांनी पत्रात शेवटी म्हटले आहे.

फेरीवाल्यांच्या प्रश्नावर एकसंघ

फेरीवाल्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र  शहरात फेरीवाल्यांच्या विविध संघटना आहेत. परंतु त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्व संघटना एकत्रित आलो आहोत. त्यामुळे एक दिलाने काम करू.

  • कॉम्रेड सदाभाऊ मलाबादे