Spread the love

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

इचलकरंजी येथील लायकर मळ्यात सुरु असलेल्या तीनपानी जुगार अडड्यावर शनिवारी रात्री छापा टाकून शिवाजीनगर पोलिसांनी अड्डाचालक आणि भागीदार यांच्यासह २४ जणांना अटक केली. त्यांच्याकडून २६ हजाराची रोकड, १४ मोबाईल, १४ दुचाकी, सीसीटीव्ही एनव्हिआर, २३ खुर्च्या, ३ टेबल यासह जुगाराचं साहित्य असा  सव्वादोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

इचलकरंजी येथील लायकर मळ्यात बेकायदेशीरपणे जुगार क्लब सुरु असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने छापा टाकला असता बेकायदेशीरपणे तीनपानी जुगार खेळला जात असल्याचं निदर्शनास आलं. याबाबत विचारणा केली सदानंद गंगाराम कदम ( वय ५८, रा.काडापुरे तळ, ) हे क्लब चालक असून युवराज आनंदा कदम (वय ३४, रा. कुलकर्णी मळा) हे क्लब पार्टनर असल्याचं स्पष्ट झालं. यावेळी पोलिसांनी क्लब चालक, पार्टरनरसह हेल्पर अनिल आप्पासो बारवाडे (वय ५२, राहणार संत मळा) आणि जुगार खेळणार्‍या २१ जणांना ताब्यात घेतलं. रोहन रामचंद्र कांबळे (वय २९, रा. सिध्दार्थनगर), संतोष सुनिल हजारे (वय ३४, रा.स्वामी अपार्टमेंन्ट समोर), रमेश कृष्णाजी डोईफोडे (वय ३५, रा.शिनाळा, ता. आथणी), आशुतोष चंद्रकांत शिंदे (वय २७, रा. संग्राम चौक), मोसिन नासिर मकुबळे (वय ३६, रा. क.सांगाव, ता. कागल), राजाराम रावसाहेब पाटील (वय ५४), किरण मल्लाप्पा कवटगे (वय ५०, दोघे रा.चंदुर), अक्षय नरेंद्र कांबळे (वय २५, रा.जांभळी), प्रेम बाळासो गांजवे (वय ३०, रा. लिगाडे मळा), शकील मेहबुब चुयेवाले (वय ३६, रा. संग्राम बांबू गल्ल), विश्वास महादेव टेके (वय ६६, रा. माळी मास्टर वाडा), संजय रघुनाथ कमते (वय३४, रा. सम्राट अशोकनगर), किशोर मारुती खोत (वय- ५१, रा. लिगाडे मळा), टिपू सुलतान मकानदार (वय ३४, रा. ५ तिकटी चौक, हातकणंगले), दत्तात्रय श्रीपती शेळके (वय४६, रा. शेळके गल्ली), हर्षद सुरेश बाबर (वय३८, रा. लिंबू चौक), रवि नारायण धापसे (सांगली नाका, इचल.), राजाराम आनंद पोवार (वय ६०, रा.चंदूर), जनार्दन बाळवंत रेडेकर (वय ६५, रा. संग्राम चौक), पुष्पेंद्र वसंत मेटे (वय ३०, रा.जुना चंदूर रोड) आणि रावबहादुर संतराम बरमा (वय ६५, रा. पुजारी मळा) अशी त्यांची नावं आहेत. याप्रकरणी राहुल कामत यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.