निबंध स्पर्धेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक
इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
पदवीधर प्रकोष्ठ, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य ऑनलाइन राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये जवळजवळ 1365 निबंध प्राप्त झालेल्या महाविद्यालयीन गटामध्ये तृतीयपंथी असणाऱ्या करण पाटील याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. समाजाने आधीच झिडकारले, छक्का, हिजडा म्हणून हिणवले, तरीही हार न मानता दहावीत बोर्डात प्रथम आला. बारावीतही बोर्डात आला आणि त्याची यशाची घौडदौड आजही सुरूच आहे. जगण्याचा संघर्ष सुरूच आहे. पण येणाऱ्या प्रत्येक संकटाशी तो दोन हात करतो याचं खूप कौतुक आहे. त्याच्या या यशासाठी सर्वत्र त्याचे खूप खूप होत आहे. प्रा.डॉ.प्रतिभा भारत पैलवान यांच्या मायेचे सावली परिवाराचा तो एक अविभाज्य भाग आहे.
“धर्म, करुणा आणि कर्तृत्वाचे प्रतीक म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर!” केवळ एक राजमाता नव्हे, तर समाजहितासाठी झटणारी एक जागृत सेविका होत्या त्या. काशीपासून रामेश्वरापर्यंत त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी आणि धर्मशाळांची उभारणी केली – त्या केवळ इमारती नव्हत्या, तर संस्कृतीच्या आधारस्तंभ होत्या. त्यांच्या कार्याचा विस्तार हा केवळ राज्यकारभारापुरता मर्यादित नव्हता, तर त्यात धर्म, न्याय, आणि मानवसेवेचे मूल्य होते. अशा या आदर्श स्त्रीशक्तीला आज आपण मानाचा मुजरा करतो कारण अहिल्याबाई म्हणजे दिव्यतेची आणि नेतृत्वाची जिवंत मूर्ती!
याच दिव्यत्वाला नमन करण्यासाठी त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी पदवीधर प्रकोष्ठ च्या वतीने भव्य अशा राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
