सामाजिक कार्याचाही सन्मान
यड्राव / महान कार्य वृत्तसेवा
आरती कुंभार यांनी सावित्री माध्यमिक विद्यामंदिर आंबेत जिल्हा रायगड येथे ३५ वर्षाहून अधिक प्रामाणिकपणे सेवा केल्याने. शिक्षण क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमटविला आहे. शिक्षण क्षेत्रात सेवा बजवताना. शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवेमध्ये असताना येत असल्या अडचणी पाहून त्यांनी या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या महामंडळावर नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली आणि आपल्या कौशल्याचे व नेतृत्वाचे पैलू त्याने सिद्ध केले. तसेच अंगी असलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे हिरकणी कन्या महिला मंडळ या माध्यमातून महिलांचे प्रबोधन व संघटन उत्तमरीत्या केल्याने या संघटनेस रायगड जिल्ह्यामध्ये मानाचे स्थान आहे. अशा या कर्तुत्वान व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करताना अभिमान वाटतो, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष व सावित्री विद्या मंदिरचे माजी मुख्याध्यापक लक्ष्मण यादव यांनी केले.
रुक्मिणीबेन नथुराम शेठ मंगल कार्यालय गोरेगाव जिल्हा रायगड येथे हा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा संपन्न झाला.
आरती कुंभार यांचा सेवापुर्ती निमित्त लक्ष्मण यादव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणे आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर संघटना महामंडळ यांचे कडून मानपत्र देण्यात आले. हिरकणी कन्या महिला मंडळ यांचे कडून रेशमी वस्त्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य, शिक्षकेतर संघटनाचे महामंडळ अध्यक्ष अनिल माने, माजी अध्यक्ष.बा.बा.गडगे, कविता खोपकर, शिवाजीराव खांडेकर, रायगड जिल्हा माध्य. व उच्च माध्य शिक्षकेतर सेवक संघ अध्यक्ष मिलींद जोशी, घनश्याम कुंभार, दत्तात्रय कुंभार, संगीता कुंभार, संजय कुंभार, मालती कुंभार, रेखा कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमांमध्ये मान्यवरांना शाल, श्रीफळ ऐवजी महायुग हा ग्रंथ व मोगऱ्याचे रोप देऊन त्यांचे जीवनही ज्ञानाने समृध्द व्हावे व मोगऱ्याप्रमाणे त्यांचे जीवननात सुगंध निर्माण व्हावा या भावनेतून मोगऱ्याचे रोप ग्रंथ भेट देऊन सत्कारातून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. असा हा आगळावेगळा सत्कारही कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. हा कार्यक्रम बिगर राजकीय होता. यामध्ये ज्ञानदेवतेचे साधक होते. यामुळे कार्यक्रमाला ज्ञान मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी आरती कुंभार यांचे ज्येष्ठ चिरंजीव सोनू व स्नुषा तेजू यांनी दुबई येथून सोशल मीडियाद्वारे सदिच्छा दिल्या.
स्वागत व प्रस्ताविक मित्सुबिशी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट संजीवकुमार कुंभार यांनी केले. राजू रणवीर, गोरेगांवचे सरपंच जुबेर अब्बासी, सुजित भोसले, अनिल कुंभार, युनायटेड इन्शुरन्सच्या मॅनेजर वनिता कुंभार, यांच्यासह महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना महामंडळाचे पदाधिकारी, हिरकणी कन्या महिला मंडळाच्या सर्व सदस्य, तसेच शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती सूत्रसंचालन अपूर्वा पांचाळ आणि नीलिमा काप यांनी केले अनिरुध्द कुंभार यांनी आभार मानले.
