उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन : तातडीने प्रश्न सोडविण्याची मागणी
गडहिंग्लज / महान कार्य वृत्तसेवा
गडहिंग्लजला आखिल भारतीय किसान सभा दूध उत्पादक संघर्ष समिती आणि पथविक्रेत्यासाठी मुक्ती संघर्ष समितीने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. यावेळी मोर्चाच्यावतीने उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
सुरुवातीस पोलीस ठाण्यापासून मोर्चाला सुरुवात झाली आहे. मुक्ती संघर्ष समितीचे मुख्य संघटक संग्राम सावंत यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चाचा लक्ष्मी दूध संस्थेच्या कारभाराची चौकशी करा आणि पथविक्रेत्यांना सुरक्षित पुनर्वसन करा अशा घोषणा देण्यात आल्या. उपविभागीय कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर लक्ष्मी दूध संस्थेच्या कारभाराची चौकशी करा आणि पथविक्रेत्यासाठी हक्काची जागा देण्याच्या मागणीची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मोर्चाच्यावतीने संग्राम सावंत, अॅड.दशरथ दळवी यांनी मार्गदर्शन केली. उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, गिजवणे येथील लक्ष्मी दूध संस्थेच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्याची मागणी, संस्थेच्या सचिवाची चौकशी करा, २०१५-२५ पर्यंत शासनाकडून लेखापरीक्षण करा, दूध उत्पादकाच्या हितासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत चौकशी व्हावी, चुकीच्या पद्धतीने नोंद झालेले सभासदत्व तातडीने रद्द करा, नियमबाह्य सभासदत्व रद्द करा आदी मागण्या केल्या आहेत.
पथविक्रेत्या संघटनेने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, शहरातील फेरीवाले,पथविक्रेत्यांना हक्काची जागा द्यावी, पालिकेने राष्ट्रीय फेरीवाले कायदा आणि पथविक्रेता अधिनियम यांचे उल्लंघन, फेरीवाले, पथविक्रेते यांचे योग्य पुनर्वसन करावे, पालिकेने स्वतंत्र फेरीवाला विभाग सुरू करावे, विमा, पेन्शन अशा सुविधा द्यावे, नोंदणीकृत प्रमाणपत्र द्यावे, नाममात्र शुल्क आकारावे, संपूर्ण पथविक्रेते यांची रितसर नोंदणी करावी आदी मागण्या निवेदनातून केल्या आहेत.
यावेळी दूध उत्पादक गोडसाखरचे माजी संचालक बाबासाहेब पाटील, प्रमोद पाटील, मानतेश बन्ने, गणेश कळेकर, सागर शिंदे, विनायक कांबळे, विजय कातकर, साहिल कुंभार, प्रभात सांबळे, विजय कडूकर, स्वप्नील कोरी, अविनाश ताशिलदार, रेखा पाटील, गायत्री रणदिवे, सुगंधा नारपगोळ, सुनिता लोहार, शितल पाथरवट, वैशाली दड्डीकर, हशिना मुल्ला, इब्राहिम मुल्ला, मंगल पाटील, संतोष पोवार, विनोद वडर, सु, श्री. लोहार, सागर काकडे यांच्यासह दूध उत्पादक, पथविक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
