Spread the love

नांदणी / महान कार्य वृत्तसेवा 

स्वाभिमानी विद्यार्थी परिषद प्रस्तुत ‘मी उद्यमी’ असा एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात भागातील अनेक तरुण-तरुणी ज्यांना नोकरी व उद्योगासाठी लढायचे आहे. अशांना एकत्रित बोलवून तज्ज्ञ लोकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सौरभ शेट्टी यांनी केले.

नांदणी (ता.शिरोळ) येथील स्वाभिमानी फूड क्लस्टर येथे तरुणांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी सौरभ शेट्टी बोलत होते.

शेट्टी पुढे म्हणाले, सध्याच्या बेरोजगारीचा परिणाम बघता गावातील मुलांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी केलेला हा स्तुत्य उपक्रम. मी उद्यमी च्या माध्यमातून भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना तरुणांना मनासारखी नोकरी व व्यवसाय आपल्या भागातच राहून करता यावा, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शेतकरी त्यावेळी सोबतच आता सर्वसामान्य मुलांच्या नोकरीवर रोजगारासंदर्भात संपूर्ण स्वाभिमानीची ताकद लावू, असे प्रतिपादन सौरभ शेट्टी यांनी केले.

यावेळी समन्वयक उत्कर्ष निकम, सी.एस.प्रवीण नरगचे, टॅक्स कन्सल्टंट राहुल चौगुले व स्वाभिमानीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सौरभ शेट्टी आणि त्यांच्या टीमने सुरू केलेल्या ‘मी उद्यमी’ या उपक्रमासाठी स्पार्कल फौंडेशन पुणे, कुरुंदवाड परिसर  मंडळ पुणे, ग्लोबयुनिक फौंडेशन पुणे यांनी यात सक्रिय सहभागी होवून, पुढील वाटचालीत मदत करण्याचे निश्चित केले आहे.