Spread the love

भोगावती / महान कार्य वृत्तसेवा

गोकुळ दूध संघाच्या वतीने जागतिक दुग्ध दिनानिमित्त जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट वासरू संगोपन स्पर्धा सुरु करणेत आली आहे. राधानगरी तालुक्यातील घोटवडे व गुडाळ गांवामध्ये सदरच्या स्पर्धा होतं आहेत, संघाकडून वासरू संगोपन योजना २००५ साली सुरु यामध्ये आठ लाखाहून अधिक वासरांची नोंदणी झाली आहे. जवळपास दीड लाख जनावरांचे अनुदान ९६ कोटी रुपये आदा करणेत आले आहेत. या योजनेमुळे जातिवंत जनावरांची पैदास तसेच दूध वाढीसाठी मदत झालेचे दिसून येते अशा स्पर्धा आयोजित केल्यामुळे दूर उत्पादकांना वासरांचे चांगले संगोपन करण्याची प्रेरणा मिळेल आणि ती विहित वेळेत गाभण जाऊन लवकर दुधात येतील म्हणूनच उत्कृष्ट वासरू संगोपन स्पर्धा संपूर्ण जिल्ह्यात घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे डोंगळे यांनी बोलताना सांगितले.

यावेळी उपस्थित सरपंच धिरज डोंगळे, संजय डोंगळे चेअरमन स्वयंभू दूध, बी. के.डोंगळे, के.द. पाटील, डॉ.सुभाष गोरे, राजेंद्र चौगले, मुकुंद पाटील, उदय पाटील तसेच दूध उत्पादक मोट्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्वागत प्रास्ताविक सहा.दूध संकलन अधिकारी राजेंद्र चौगले यांनी केले. त्यांनी उत्कृष्ट वासरू संगोपन स्पर्धा नियम अटी माहिती दिली. 

सरपंच धिरज डोंगळे यांनी गोकुळच्या सेवासुविधा याचा जास्तीत जास्त उत्पादकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

सदर स्पर्धेत गाय वासरू व रेडी यामध्ये 0 ते ६ महिने आणि ६ ते एक वर्ष असे चार गटामध्ये स्पर्धा घेण्यात आली विजेत्यांना प्रमाणपत्र शिल्ड व रोख रक्कम बक्षीस देणेत आले. आभार अभिषेक डोंगळे चेअरमन हनुमान दूध संस्था यांनी मानले.