Spread the love

मुंख्यमंर्त्यांविरोधात तक्रारही दाखल

बंगळुरु / महान कार्य वृत्तसेवा

पहिल्यांदाच आयपीएल चॅम्पियन बनलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) चा जल्लोष बुधवारी एका मोठ्या अपघातात बदलला. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर विजेत्या खेळाडूंचं स्वागत करण्यासाठी गर्दी जमली असताना झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी आहेत. या घटनेनंतर सर्व स्तरातून आयोजकांवर टीका होत आहे. आता संदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयानं याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. आज दुपारी 2:30 वाजता न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.

मुख्यमंर्त्यांविरोधात तक्रार : या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते स्नेहमयी कृष्णा यांनी क्यूबन पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. तसंच त्यांनी आयपीसीच्या कलम 106 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

इघ्ीं करण्याची मागणी : तसंच आम आदमी पक्षाचे वकील लोकित यांनी बेंगळुरुच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल करुन कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) विरुद्ध बुधवारी एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की केएससीएच्या निष्काळजीपणामुळं ही दुर्घटना घडली. केएससीएविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारं औपचारिक पत्र सादर करण्यात आलं आहे. घटनेवरुन राजकारण : कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी परमेश्वर म्हणाले, ”मुख्यमंर्त्यांनी अपघाताच्या न्यायालयिनं चौकशीचे आदेश दिले आहेत. अहवाल आल्यावर जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.” तसंच या घटनेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, ”मी या घटनेचा बचाव करत नाहीये, पण देशात यापूर्वी अनेक मोठे अपघात झाले आहेत, जसं की कुंभमेळ्यात 50-60 जणांना आपला जीव गमवावा लागला. तथापि, याचा अर्थ असा नाही की आपण जबाबदारी टाळावी.” तर भाजपानं त्यांचा राजीनामा मागितला आहे.