Spread the love

बेंगळुरु चेंगराचेंगरीवरुन मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचं अबज विधान

बेंगळुरु / महान कार्य वृत्तसेवा

बेंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमजवळ ण्ींँ चा विजयोत्सव सुरु असताना चेंगराचेंगरी झाली. या घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. दरम्यान, या घटनेवरुन राजकारण तापू लागलं आहे. भाजपानं कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आरोपांनी वेढले गेले असताना, त्यांनी महाकुंभ चेंगराचेंगरीचा उल्लेख करुन भाजपाला प्रत्युत्तर दिलं.

काय म्हणाले सिद्धरामय्या : चिन्नास्वामी स्टेडियमजवळील झालेल्या घटनेनंतर सिद्धरामय्या म्हणाले, ”अशा घटना अनेक ठिकाणी घडल्या. मी इतर घटनांशी तुलना करुन त्याचं समर्थन करणार नाही. कुंभमेळ्यातही 50-60 लोक मारले गेले, मी तेव्हाही त्यावर टीका केली नव्हती.” तसंच जर काँग्रेस टीका करत असेल तर ती वेगळी बाब आहे. मी किंवा कर्नाटक सरकारनं टीका केली का? असा सवालचं त्यांनी विचारला.

सराकरकडून दु:ख व्यक्त : या घटनेवर दु:ख व्यक्त करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, ”बेंगळुरुतील चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला आणि 33 जण जखमी झाले. हा अपघात घडायला नको होता. या घटनेबद्दल सरकार तीव दु:ख व्यक्त करते.” त्याचप्रमाणे सरकारनं मृतांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. जखमींना सरकार मोफत उपचार देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

35 हजारांची क्षमता, 3 लाख उपस्थित : कर्नाटकच्या मुख्यमंर्त्यांनी असंही सांगितलं की त्यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, ”मी या घटनेचं समर्थन करु इच्छित नाही. आमचं सरकार यावर राजकारण करणार नाही. मी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत आणि 15 दिवसांचा वेळ दिला आहे. लोकांनी स्टेडियमचे दरवाजेही तोडले. चेंगराचेंगरी झाली. एवढ्या मोठ्या गर्दीची अपेक्षा कोणीही केली नव्हती. स्टेडियमची क्षमता फक्त 35000 लोकांची आहे, पण 2-3 लाख लोक आले.” पंजाबचा पराभव करत जिंकलं आयपीएल : 17 वर्षांच्या प्रतीक्षेचा अंत करुन आरसीबीनं अखेर आयपीएल ट्रॉफी जिंकली. मंगळवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात त्यांनी पंजाब किंग्जचा सहा विकेट्‌‍सनं पराभव केला. आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी बेंगळुरुच्या रस्त्यावर प्रचंड गर्दी जमली होती.