Spread the love

आमदार डॉ.अशोक माने यांच्या प्रयत्नांना यश

हातकणंगले विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा (विठ्ठल बिरंजे)

हातकणंगले  तालुक्यातील ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून तब्बल 51 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याचा 2560 लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ होणार आहे. तालुक्यातील घरकुलांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होण्याची पहिलीच वेळ आहे. यासाठी आमदार डॉ. अशोकराव माने बापू यांनी विशेष प्रयत्न घेतले.

हातकणंगले तालुका विस्ताराने मोठा आहे. तब्बल अडीच ब्लॉक चा हा तालुका असल्यामुळे लोकप्रतिनिधींना विकास कामे आणि शासनाच्या विविध योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. परंतु आमदार डॉ. अशोकराव माने बापू  येथील जनतेला मूलभूत सुविधा मिळायला पाहिजेत, यासाठी प्रयत्न करत आहेत.

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात मतदारसंघासाठी 108 कोटी रुपयांचा निधी त्यांनी खेचून आणला. तर दोन दिवसांपूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेतून तब्बल 2560 घरकुलांसाठी निधी मंजूर करून घेतला. प्रत्येक घरकुलासाठी 2 लाख रुपये याप्रमाणे तब्बल 51 कोटी 20 लाख रुपयांचा निधी हातकणंगले तालुक्यात आलेला आहे. यामुळे घरकुलांचे लाभार्थी समाधान व्यक्त करत आहेत. मतदारसंघातील 20 गावांमध्ये पहिल्या टप्प्यात हा निधी आला असून उर्वरित गावांसाठी निधी आणण्यासाठी माने यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर हुपरी, वडगाव नगरपालिका आणि हातकणंगले नगरपंचायत हद्दीतील घरकुलांसाठी अडीच लाख रुपये प्रमाणे निधी आणण्यासाठी प्रयत्न असल्याचे माने यांनी सांगितले.

गावनिहाय घरकुलांची यादी

रुई 249, चंदुर 249, कबनूर 248, तारदाळ 230, लाटवडे 219, आळते 211, पट्टणकोडोली 172, हेरले 161, कुंभोज 159, रुकडी 103, रेंदाळ 95, कोरोची 71, तळसंदे 71, साजणी 68, घुणकी 66, भादोले 46,  मिनचे 43, माणगाव 47,  रांगोळी 4, भेंडवडे 2

घरकुलांसाठी वाळू उपलब्ध करून देणार

प्रधानमंत्री आवास योजनेतून यापूर्वी मंजूर झालेल्या आणि आता नव्याने निधी मिळालेल्या घरकुलांसाठी राज्य शासनामार्फत प्रत्येक घरांसाठी पाच ब्रास वाळू मोफत आणि तीही तातडीने देण्याच्या सूचना तहसीलदार यांना केलेले आहेत.

आमदार डॉ. अशोकराव माने बापू