Spread the love

शिरोळमध्ये १३ जूनला जागतिक देहदान जागृती दिन साजरा करण्याचा निर्णय : खंडेराव हेरवाडे

शिरोळ / महान कार्य वृत्तसेवा

१३ जून रोजी जागतिक देहदान जागृती दिन साजरा करण्यात येत असून, या निमित्ताने शिरोळ तालुक्यातील नागरिकांनी मरणोत्तर देहदान व अवयव दान करून गरजू रुग्णांना नवे जीवनदान देण्याच्या कामात सहभागी व्हावे, असे आवाहन या चळवळीचे प्रणेते खंडेराव हेरवाडे व शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार यांनी केले आहे.

यावेळी खंडेराव हेरवाडे म्हणाले, मृत्यूनंतर ज्या देहाचा काही उपयोग होत नाही. उलट आपण विनाकारण विधी करतो. जिवंतपणी माणसाची आपण जी सेवा करतो ती खरी सेवा आहे. देहत्याग केल्यानंतर अवयवदान केल्याने मृत्यूच्या शय्येवर असणाऱ्या एखाद्या रुग्णांना त्या अवयवाचा उपयोग होतो. देहदान केल्याने वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच प्रयोगशाळेत संशोधनासाठी उपयोग होतो. आमदार स्वर्गीय दिनकररावजी यादव स्मृतिदिनानिमित्त १ फेब्रुवारीला नागरिकांना आवाहन केल्यानंतर शिरोळ शहर व परिसरातील सुमारे 75 नागरिकांनी देहदान करून आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला होता. अशा उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकाविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. तेव्हा शिरोळ तालुक्यातील नागरिकांनी १२ जून पर्यंत देहदान व अवयवदान बाबत निर्णय घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी सचेतन बनसोडे, पृथ्वीराजसिंह यादव, अविनाश माने, डॉ.दगडू माने, शंतनु यादव, संजय सुतार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी खंडेराव पार्वती शंकर हेरवाडे 9822206008 अथवा सचेतन बनसोडे 8805243525 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केली आहे.