इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजीत 22 मे अखेर 31687 लाभार्थ्यांचे ईकेवायसी प्रक्रिया प्रलंबित आहे. राज्य सरकारने वारंवार मुदतवाढ देवून देखील तांत्रिक कारणांमुळे ई-केवायसी पेंडिंग असल्याचे दिसून येत आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाने अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली आहे. या निर्णयामुळे अन्नधान्य वाटप अधिक पारदर्शक होणार आहे. लाभार्थ्यांनी आपले आधार क्रमांक रेशन कार्डाशी लिंक करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही मोहिम राबवण्यात येत असून, ठरावीक मुदतीत ई-केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांचे रेशनकार्ड तात्पुरते बंद करण्यात येऊ शकते.
ई-केवायसीमुळे बनावट लाभार्थ्यांची छाननी होणार असून, योग्य गरजू कुटुंबांपर्यंत अन्नधान्य पोहोचेल, असा शासनाचा उद्देश आहे. वेळेत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन येथील पुरवठा अधिकारी यांनी केले आहे केले आहे.
तांत्रिक अडचण
ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना लहान मुले आणि वृद्ध लाभार्थी यांच्या बोटाचे ठसे किंवा डोळ्यांचे बुभुळ स्कॅन होत नसल्याने अशा लाभार्थ्यांचे केवायसी पेंडिंग राहत आहे त्यामुळे अशा लाभार्थ्यांसंदर्भात सरकारने नवीन नियमावली जाहीर करणे आवश्यक आहे.
22 मे अखेर इचलकरंजी
लाभार्थी 163380
प्रक्रिया पूर्ण 131690
प्रक्रियेत 11044
पेंडिंग 31687
