Spread the love

जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा 

महाराष्ट्र शासन नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडून ३० मे रोजी जयसिंगपूर, शिरोळ व कुरुंदवाड येथील नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासकीय स्तरावर करण्यात आल्याचे आदेश नगरपरिषद प्रशासनाला आले आहेत.

जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ येथील नगर परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संबंधित ठिकाणचा शासकीय कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांची इतरत्र बदली झाली आहे.  नवीन अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्ती झाल्या आहेत. याबाबतचा आदेश नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडून जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड नगरपरिषद प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. 

जयसिंगपूर नगरपरिषद येथे  कार्यरत असलेले पदाधिकारी  संदीप विश्वास कांबळे स्वच्छता निरीक्षक श्रेणी ‘क’ यांची बदली वडगाव जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी झाली आहे यांच्या जागी विशाल सयाजी धनवडे स्वच्छता निरीक्षक श्रेणी ‘क’ वडगाव जिल्हा कोल्हापूर येथून जयसिंगपूर येथे बदली झाली आहे. प्रमोद अण्णासो थोरात विद्युत अभियंता श्रेणी ‘क’ पलूस जिल्हा सांगली येथून जयसिंगपूर येथे बदली झाली आहे. जमीरअहमद अन्वर मुश्रीफ पाणीपुरवठा स्वच्छता अभियंता जयसिंगपूर येथून फलटण येथे बदली झाली आहे.

अमोल मनोहर कांबळे स्वच्छता निरीक्षक कुरुंदवाड यांची बदली कागल येथे झाली आहे त्यांच्या जागी प्रमोद लालचंद फुले स्वच्छता निरीक्षक तळेगाव दाभाडे येथून कुरुंदवाड येथे झाली आहे. प्रदीप जनार्दन बोरगे स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता  कुरुंदवाड येथून महाबळेश्वर या ठिकाणी बदली झाली आहे त्यांच्या जागी विजय शामराव पाटील पाणीपुरवठा स्वच्छता अभियांता कागल येथून कुरुंदवाड येथे बदली झाली आहे. अमन जाकिर मोमीन पाणीपुरवठा अभियांत शिरोळ येथून राजगुरुनगर पुणे येथे बदली झाली आहे त्यांच्या जागी सुहेब रशीदअहमद काझी पाणीपुरवठा स्वच्छता अभियांता शेंदुर्णी जिल्हा जळगाव येथून शिरोळ येथे बदली झाली आहे. एकंदरीत प्रशासकीय बदल्या झाल्यामुळे जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ या ठिकाणी त्या विभागातील कामाला गती मिळते की नाही हे येणारा काळ ठरवणार आहे.