शिरोळ / महान कार्य वृत्तसेवा
शिरोळ तालुका लिंगायत समाज वतीने १० वी, १२ वी व स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या वर्षी मान्यवरांच्या प्रबोधनातून संपन्न झाला. सुरूवातीस महात्मा बसवेश्वर यांच्या व लिंगायत समाजातील बसवत्व प्रचारक स्वर्गीय राजेंद्र शहापूरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे गजेंद्र कुल्लोळी, प्रा.मनोहर कोरे, प्रा.मंगेश जोंग, पोलिस उपनिरीक्षक मिनल फुटाणे, उद्योजक मारुती माळी, कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना आपला अनुभव सांगत दहावी, बारावी नंतर काय करावे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.बी.के.देवताळे, अजित कोरे, बी.एस.पाटील, डॉ.जे.बी.पाटील, आण्णासाहेब कागले, रमेशकुमार मिठारे, स्वप्निल कुंभार, सच्चिदानंद आवटी, संजय शहापूरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वागत स्वप्निल माळी यांनी केले, तर प्रस्तावना करताना मनोजकुमार रणदिवे यांनी महात्मा बसवेश्वराचा वचन सांगितले. आभार स्वप्निल चौगुले यांनी मानले. सुत्रसंचलन महेश घोटणे यांनी केले. सदरच्या कार्यक्रमास परिसरातील समाज बांधव, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

