Oplus_131072
Spread the love

वर्क ऑर्डर उन्हाळ्यातील आणि डांबरीकरण पावसाळ्यात  

शाहुवाडी / महान कार्य वृत्तसेवा विकास कांबळे 

करंजोशी ते आरुळ (ता.शाहुवाडी) या रस्त्यांवर २ किलोमीटर अंतरावर आरूळ गाव आहे. सद्या या  मुख्य रस्त्याचे काम ऐन पावसाळ्यात चालू करण्यात आले आहे. येथे पावसाळ्याच्या सुरुवातीस डांबरीकरणाचे काम चालू झाले आहे. भर उन्हाळ्यात आराम करायचा आणि पाऊस चालू झाला कि डांबरीकरण काम चालू कारायचे, हा कॉन्टॅक्टरने नविन धंदा चालू केला आहे. उन्हाळ्यात टेंडर काढून दोन महिने आराम केला आणि ऐन पावसाळ्याच्या  सुरवातीला डांबरीकरण करण्यास  सुरुवात केली आहे.

प्रत्येक खेडेगावात एप्रिल ते मे महिन्यामध्ये गावच्या यात्रा सुरू असतात यात्रे निमित्ताने मुंबई, पुणे येथील चाकरमानी आपली गावाला येत असतात. मे सुट्टीत आनंद घेण्यासाठी आले असल्याने या सुट्टी दरम्यान या रस्त्यांवरून तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यावेळी रस्ता खराब असताना कधी डांबरीकरण केले नाही. त्यामुळे लोकांच्या चार चाकी, दोन चाकी गाड्या खड्ड्यातून जाताना जो त्रास झाला, तो सांगता येईना  तो गाडी मालकालाच माहित पण ठेकेदार काय पडले नाही. पावसाळ्यात पाऊसाच्या पाण्याने रोड धूऊन गेला की नवीन टेंडर काढण्यासाठी रान मोकळे हेच चाललंय.

शाहूवाडी तालुक्यात आतापर्यत करंजोशी ते आरूळ या २ किलोमीटर अंतरावर डांबरीकरणाचे ऐन रिमझिम पावसात काम चालू आहे. पावसाळा सुरू होण्यास काही दिवस चालू असताना  डांबर टाकायचे काम सुरुवात करण्यात आले आहे. वर्क ऑर्डर उन्हाळ्यामध्ये काढायची जूनच्या पहिल्या तारखेला डांबरीकरण चालू करायचे हे कोणत्या प्रकाराचे काम असा गावकऱ्यांना प्रश्न पडला आहे.

पावसाळ्यात गावस्तरावर ग्रामसडक  डांबरीकरण कामाचा हाट का ? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये गावच्या ठिकाणी यात्रा, थोर महापुरुषांच्या जयंती महोत्सव त्याच बरोबर पुणे मुंबई या टिकून येणारी आपले गावकरी यांच्यासाठी रस्ता चांगला असावा तेव्हा डांबरीकरण  पावसाळ्यात सुरू न करता उन्हाळ्यात सुरू करावे अशी सामान्य नागरिकांनी म्हणणे आहे 

बांधकाम विभाग ने ग्रामसडक योजनेतून रस्ता करायचा असेल तर उन्हाळ्यात मध्ये डांबरीकरण करावयाचे असा सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे. या कामा संदर्भात माहिती घेतली असता टक्केवारीचा प्रश्न असल्याचे दिसून येत आहे.

बाळासाहेब पाटील ( उपसरपंच, आरूळ)