कबनूर / महान कार्य वृत्तसेवा (अजित लटके)
गवळी समाजाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली असून समाजाला दिशा देण्याचं काम केलेले आहे. अनेक जुन्या चालीरीतींना मूठमाती देऊन महिलांचा सन्मान केलेला आहे. समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर यांनी केले.
ते इचलकरंजी शाखेच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी भाजपा अध्यक्ष अमृत मामा भोसले, उपसरपंच सुधीर लिगाडे, माजी उपसरपंच निलेश पाटील, आबा घायतिडक, संजय निकम, भाऊसो आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळी गवळी समाजाच्या स्वमालकीच्या जागेत गवळी समाज हॉलचे भूमिपूजन झाले. यानंतर रामरत्न हॉल येथे कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. स्वागत प्रास्ताविक इचलकरंजी शाखा अध्यक्ष बाबुराव डाकरे यांनी केले. यानंतर मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे उपाध्यक्ष युवराज गवळी, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस यशवंतराव हाप्पे, पालक विश्वस्त व माजी अध्यक्ष अशोकराव दाते, उदय पाटील, नितीन ठसाळे, विजय गवळी, माजी उपसरपंच निलेश पाटील, ट्रस्टचे माजी अध्यक्ष कृष्णाजी डाकरे, शिवसेना शहर प्रमुख भाऊसो आवळे यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयदिप डाकरे यांनी केले.
यावेळी इचलकरंजी मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर, कपिल शेटके, म्हाळसाकांत कवडे, इचलकरंजी शाखेचे पदाधिकारी मोहन दाभोळकर, संजय हाणफोडे, अर्चना डाकरे, मारुती काटाळे, मारुती डाकरे, संजय चिले, दिलीप महाडिक, प्रशांत महाडिक, चंद्रशेखर पंदारे, अजित लटके, श्रीपती महाडिक, चंद्रशेखर पोरे, सतीश गावकर, शाम शिंदे, सुनील म्हाबळे, सीमा महाडिक, शंकरराव महाडिक, प्रवीण हाणफोडे, सतीश हाणफोडे यांसह महिला, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संभाजी डाकरे यांनी मानले.
