Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरू होती. मात्र, आज सकाळीच बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी उसळण दिसून आली. सोन्यासोबत चांदीच्या दरातही तेजी दिसून आली. सोन्याचा दर आता पुन्हा एकदा एक लाख रुपये प्रति तोळ्याचा दर गाठणार का, याकडे बाजारातील तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. सोन्याच्या दरात आज अचानक मोठी तेजी दिसून आली. या तेजी मागील कारणही चिंता वाढवणारे आहे.

2 जून 2025 रोजी सोन्या-चांदीच्या दरात एकाचवेळी लक्षणीय वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज (चउद) वर 5 ऑगस्ट 2025 रोजी डिलिव्हरीसाठी असलेले सोने 0.52 टक्क्यांनी वाढून 96,375 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी पातळीवर पोहोचले. त्याचबरोबर 5 जुलै डिलिव्हरीसाठीची चांदीही 0.42 टक्क्यांनी महाग होऊन 97,420 रुपये प्रति किलो झाली आहे.

ही तेजी केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही दिसून आली. उजचएद (कॉमेक्स) या जागतिक कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 0.75 टक्क्यांनी वाढून 3313.70 डॉलर प्रति औंस झाले. तर चांदीचे दर 0.59 टक्क्यांनी वाढून 33.22 डॉलर प्रति औंस झाले आहेत.

दरवाढीचे कारण काय?

सोन्या-चांदीच्या या दरवाढीचे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढता तणाव असल्याचे दिसून येत आहे. यूक्रेनने रशियावर ड्रोन हल्ला करत रशियाचे लढाऊ विमाने उद्धवस्त केली. त्यानंतर आता रशियादेखील आक्रमक प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात स्टील आणि ॲल्युमिनियमवर दुप्पट कर लावण्याची धमकी दिली आहे. यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीसाठी पुन्हा एकदा सोन्याकडे वळण्यास सुरुवात केली आहे.

सोने-चांदी महागलं, तुमच्या शहरात दर काय?

दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर नव्या उंचीवर पोहोचले आहेत. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर सर्वच शहरांमध्ये 97,600 ते 97,800 रुपयांदरम्यान आहे. 22 कॅरेटचे दर सुमारे 88,550 ते 89,650 रुपयांपर्यंत आहेत. चांदीसुद्धा जवळपास 97,420 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.