वारणा कोडोली / महान कार्य वृत्तसेवा
एक जून १९४८ पासून नेहमीच प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचा ७७ वां वर्धापन दिन कोडोली बस स्थानकामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एसटी बसची प्रतिकृती ठेऊन केक कापण्यात आला.
कॉलेजचे माजी प्राध्यापक अनिल देशपांडे तसेच एसटीचे सेवानिवृत्त लेखाधिकारी सुरेश कुलकर्णी कोडोली बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक उमेश शिंदे तसेच चालक वाहक दीपक भाकडे, प्रशांत चोपडे, रहमान नदाफ, राजेंद्र फाळके उपस्थित होते. यावेळी स्टॅम्प रायटर उत्तम कापरे यांनी बसस्थानकासाठी जोतिबाची प्रतिमा भेट दिली. यावेळी एसटीच्या वर्धापन दिनाची रांगोळी आवारात पूजा इंदुलकर यांनी साकारली होती. कार्यक्रम प्रसंगी व्यापारी असोसिएशनचे बाबा पाटील, विलास मनवर यांच्यासह प्रवासी उपस्थित होते.

